अॅमेझॉनवर ‘टीसीएल टीव्ही डेज’चे आयोजन

मुंबई:
नव्या युगातील ग्राहकांचे अधिक मनोरंजन करण्यासाठी टीसीएल या जगातील दुस-या क्रमांकाची टीव्ही निर्माता आणि अग्रगण्य कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने अॅमेझॉनवर टीसीएल टीव्ही डेजचे आयोजन केले आहे. कंपनीच्या एक्सक्लुझिव्ह सेलचा भाग म्हणून, यात ब्रँड फूल एचडी, ४के अल्ट्रा एचडी आणि एआय ४के यूएचडी टीव्ही हे आकर्षक किंमतीत ऑफर करेल. याची किंमत १८,९९९ रुपयांपासून सुरु होईल. हा सेल २५ सप्टेंबर २०२० पासून लाइव्ह असेल व २७ सप्टेंबर २०२० पर्यंत सुरू असेल.
या विशेष सेलमध्ये टीसीएल एफएचडी एस६५००एफएस, ४के अल्ट्रा एचडी पी८ई, एआय ४के युएचडी पी८एस आणि एआय ४के युएचडी पी८ हे चार मॉडेल्स ऑफर करत आहे. एस६५००एफएस हा केवळ ४० इंच प्रकारात असून तो १८,९९९ रुपये किंमतीत असेल. पी८ईमध्ये ४३ इंच आणि ६५ इंच असे दोन प्रकार असून ते अनुक्रमे २६,६९९ आणि ५५,४९९ रुपयांत उपलब्ध असतील. पी८एस हे फार फील्ड व्हॉइस सर्च फिचरयुक्त असून यात ५५ इंच आणि ६५ इंच असे दोन प्रकार असून ते अनुक्रमे ४१,४९९ रुपये व ५९,४९९ रुपयांत उपलब्ध असतील. पी८ हे देखील ४३ इंच आणि ६५ इंच प्रकारात उपलब्ध असून ते अनुक्रमे २४,६९९ रुपये आणि ५३,४९९ रुपयांत उपलब्ध आहेत.
ऑनलाईन शिक्षणावर विद्यार्थी खूश

टीसीएल इंडियाचे महाव्यवस्थापक माइक चेन म्हणाले, “आम्ही टीसीएलमध्ये काही आकर्षक डील्स घेऊन आलो आहोत. त्यात काही उत्कृष्ट एफएचडी आणि यूएचडी स्मार्ट टीव्ही अगदी किफायतशीर किंमतीत ऑफर केले आहेत. या ऑफर्सद्वारे आम्ही ग्राहकांना आमचे टीव्ही खरेदी करण्यासाठी आकर्षित करतच आहोत, पण यासोबतच ग्राहकांच्या गरजा भागवणारे सर्वोत्कृष्ट मनोरंजनाचे साधन मिळवून देण्याची सुनिश्चिती करतो. स्मार्ट टीव्हीच्या ऑफरमध्ये मायक्रो डिमिंग, हँड्स-फ्री व्हॉइस कंट्रोल, एचडीआर आणि एचडीआर प्रो आणि डॉल्बी ऑडिओ यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज स्मार्ट टीव्हींचा समावेश आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here