‘आम्ही देऊ जगाला मोफत व्हेंटिलेटर्स्’

elon musk

करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करताना मोठया प्रमाणावर व्हेंटिलेटर्सची गरज भासत आहे. जगातील सर्वच प्रमुख देशांनी व्हेंटिलेटर्सच्या निर्मितीला गती दिली आहे. या पार्श्वभूमीवर टेस्ला कंपनीचा सीईओ इलॉन मस्कने एफडीएने मंजूर केलेल्या व्हेंटिलेटर्सचा मोफत पुरवठा करण्यास आपली कंपनी तयार असल्याचे म्हटले आहे.
टेस्लाच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या जगभरातील भागांमध्ये व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करण्यास आम्ही तयार आहोत असे इलॉन मस्कने ट्विटमध्ये म्हटले आहे. पण त्याने दोन अटी ठेवल्या आहेत. तुम्हाला व्हेंटिलेटर्सची तात्काळ आवश्यकता असली पाहिजे व भविष्यात वापरण्यासाठी तुम्ही ती गोदामात ठेवायची नाहीत अशा दोन अटी मस्कने ठेवल्या आहेत.
व्हेंटिलेटर्स बनवणे कठिण नाही. पण लगेच त्याची निर्मिती करता येत नाही असे मस्क मागच्या महिन्यात म्हणाला होता. स्पेसएक्सने बनवलेल्या अवकाश यानात लाईफ सपोर्ट सिस्टिम असते. व्हेंटिलेटर्स बनवणे कठिण नाही. पण ते लगेच बनवता येत नाही असे मस्क म्हणाले होते. न्यू यॉर्कमधील एका हॉस्पिटलला टेस्लाने 40 व्हेंटिलेटर्स मोफत दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here