आला देशातील पहिला ‘हाय स्ट्रीट ब्रॅण्‍ड’

मुंबई :
भारताचा आघाडीचा मेन्‍सवेअर अॅण्‍ड बॉइज वेअर ब्रॅण्‍ड इंडियन टेरेनने आकर्षक स्थिर फॅशन रेंज निर्माण करण्‍यासाठी फेअरट्रेड इंडियासोबत सहयोग केला आहे. ही रेंज पर्यावरणाचे संरक्षण करते आणि गुजरातमधील फेअरट्रेड शेतक-यांना सक्षम करत, फॅशनची सामाजिक व पर्यावरणीय उपस्थिती व्‍यापक होत असताना ब्रॅण्‍ड्ससाठी परिवर्तनाला चालना देणे देखील तितकेच महत्त्वाचे बनले आहे. इंडियन टेरेन स्थिर फॅशनला अधिक मुख्‍य प्रवाहात आणण्‍याची भूमिका जाणते. फेअरट्रेड कॅप्‍सूल कलेक्‍शन सादर करण्‍यासाठी भारताचा पहिला हाय स्ट्रिट ब्रॅण्‍ड बनण्‍याप्रती कटिबद्धता याच दिशेने एक पाऊल आहे. इंडियन टेरेनद्वारे फेअरट्रेड लेबल असलेले कलेक्‍शन/कॅप्‍सूलचा अर्थ म्‍हणजे कलेक्‍शन/कॅप्‍सूल बनवणारी शेती व कारखान्‍यांमध्‍ये सामाजिक व पर्यावरणीय स्थिरता दर्जांचे पालन करण्‍यात आले आहे. तसेच याचा अर्थ असा की, शेतक-यांना त्‍यांच्‍या उत्‍पादनासाठी योग्‍य मूल्‍य मिळाले आहे, कोणत्‍याही घातक कीटकनाशकांचा वापर करण्‍यात आलेला नाही, बाल मजूरांना प्रतिबंध असून तसेच हे कापड बनवताना पर्यावरणाचे संरक्षण करण्‍यात आले आहे.
या सहयोगाबाबत बोलताना इंडियन टेरेन फॅशन लिमिटेडचे व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ. चरथ नरसिंहन म्‍हणाले, ”आपणा सर्वांना माहितच आहे की, फॅशन क्षेत्र सर्वसमावेशक राहिले आहे आणि अधिक पर्यावरणास अनुकूल बनत आहे. अधिक स्थिर राहणीमानाचा अवलंब करण्‍याप्रती ग्राहकांमध्‍ये सतत चर्चा होत आहे. आम्‍ही फेअरट्रेड इंडियासोबतच्‍या आमच्‍या सहयोगाच्‍या माध्‍यमातून विश्‍वास, स्थिरता व दर्जाच्‍या या वाढत्‍या पैलूंची पूर्तता करत स्थिरतेप्रती आणखी एक पाऊल उचलले आहे. ज्‍यामुळे आम्‍ही गुजरात जिल्‍ह्यामधील शेतक-यांकडून आणण्‍यात आलेली, तसेच फेअरट्रेड कापसापासून बनवण्‍यात आलेली उत्‍पादन रेंज निर्माण करणारा भारताचा पहिला हाय स्ट्रीट ब्रॅण्‍ड बनलो आहोत.” 
ते पुढे म्‍हणाले, ”अधिक पुढे जात आमचा पुढील तीन वर्षांमध्‍ये फेअरट्रेड कापूस, पुनर्चक्रण केलेला कापूस, पुनर्चक्रण केलेले पॉलिस्‍टर आणि बांबू व ताग यासारखी सेंद्रिय व नैसर्गिक फायबर्सपासून काळजीपूर्वक व स्थिरपणे ५० टक्‍क्‍यांहून अधिक पोर्टफोलिओ उत्‍पादित करण्‍याचा मनसुबा आहे. आम्‍ही प्रमाणित पुरवठादारांसोबत काम करू आणि पुरवठा साखळी भागीदार आमच्‍या उद्देशांशी संलग्‍न असल्‍याच्‍या खात्रीसाठी वापरण्‍यात येणा-या कच्‍चा मालांचा शोध घेण्‍याची क्षमता सादर करू. आम्‍ही बायो-डिग्रेडेबल पॅकेजिंग व उत्‍पादन पुनर्चक्रणाच्‍या माध्‍यमातून इतर प्रक्रियांप्रती स्थिर उपक्रम देखील सुरू करू.”

फेअरट्रेड इंडियासोबतच्‍या सहयोगाने सादर करण्‍यात आलेले इंडियन टेरेनचे नवीन कलेक्‍शन ग्राहकांना जबाबदार स्‍टाइल स्‍टेटमेंटसह अधिक फॅशनेबल अॅपरल्‍स देते. विविध प्रकाच्या अद्वितीय ग्राफिक प्रिंट्स, आकर्षक व पेस्‍टल रंगांची रेंज, इंडियन टेरेन कापडाचे कम्‍फर्ट कलेक्‍शनला आवडीचे बनवतात. कॅप्‍सूल कलेक्‍शन सध्‍या टी-शर्टसचे कलेक्‍शन देते, ज्‍यामध्‍ये पुरूष व मुलांसाठी क्रू नेक टी-शर्टसचा समावेश आहे आणि या कलेक्‍शनमध्‍ये अधिक वाढ करत टी-शर्टस् व्‍यतिरिक्‍त शर्टस् व ट्राऊझर्सचा समावेश करण्‍यात येईल. ग्राहकांनी इंडियन टेरेन फेअरट्रेड कलेक्‍शनमधून अधिक उत्‍पादने खरेदी केल्‍यास शेतकरी संघटना प्राप्‍त करणा-या फेअरट्रेड प्रीमिअमचे प्रमाण अधिक असेल. स्थिरता तुम्‍हाला उत्तम भावना देते.
फेअरट्रेड इंडियाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अभिषेक जानी म्‍हणाले, ”जागतिक फॅशन उद्योगक्षेत्र कोविड-१९च्‍या परिणामांमधून सावरण्‍याचा प्रयत्‍न करत असताना इंडियन टेरेनने स्थिरतेला चालना देण्‍याचा धाडसी निर्णय घेतला आहे. त्‍यांच्‍या फेअरट्रेड कलेक्‍शनच्‍या सादरीकरणासह इंडियन टेरेन भूमाता आणि त्‍यांच्‍या पुरवठा साखळीमधील असुरक्षित समुदायांप्रती कटिबद्धता दाखवण्‍यासोबत भारतीय कापूस उत्‍पादक शेतक-यांना त्‍यांच्‍या उत्‍पादनांसाठी बाजारपेठ मिळण्‍याची आणि योग्‍य मूल्‍य मिळण्‍याची देखील खात्री देते. फॅशन उद्योगक्षेत्रामध्‍ये कार्यरत असलेल्‍या ब्रॅण्‍ड्स व व्‍यवसायांनी प्रदूषण आणि उत्‍सर्जन चक्राचे निराकरण करण्‍यामधील किंवा सकारात्‍मक परिवर्तन व सामाजिक सक्षमीकरणाचे एजंट्स बनण्‍यामधील त्‍यांची भूमिका ओळखली पाहिजे. इंडियन टेरेन सारख्‍या मोठ्या स्‍थानिक ब्रॅण्‍डची कापसामधील मोठ्या स्थिरतेप्रती कटिबद्धता या कृषी समुदायांमध्‍ये भावी विकास प्रकल्‍पांना चालना देण्‍यास प्रेरित करते आणि आशेचा किरण निर्माण करते की, फॅशन उद्योगक्षेत्र पर्यावरणदृष्‍ट्या व सामाजिकदृष्‍ट्या जबाबदार फॅशनप्रती सखोल कटिबद्धता राखत महामारीच्‍या परिणामांमधून बाहेर पडू शकते.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here