एयर इंडियाने केले २०० पायलटना टाटा 

AIR INDIA CORONA

एअर इंडियाने २०० वैमानिकांना कामावरुन कमी केलं आहे. त्यांचे कॉन्ट्रॅक्ट रद्द केले आहेत. निवृत्तीनंतर पुन्हा एअर इंडियामध्ये काम करणाऱ्या काही वैमानिकांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. केंद्र सरकारने १४ एप्रिलपर्यंत सर्व आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे रद्द केली आहेत. करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. पीटीआयने हे वृत्त दिले आहे.
करोना व्हायरसचा हवाई वाहतूक क्षेत्राला सर्वात मोठा फटका बसला आहे. उड्डाणे रद्द झाल्यामुळे अनेक हवाई कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केली आहे. विमान उड्डाणे बंद असल्यामुळे एअर इंडियाच्या महसूलात मोठी घट झाली आहे. त्यामुळे एअर इंडियाने २०० वैमानिकांचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
काही वैमानिक निवृत्तीनंतर पुन्हा सेवा बजावत होते. आधीच डबघाईला आलेल्या एअर इंडियला करोना व्हायरसमुळे आणखी मोठा आर्थिक फटका बसला आहे. पैशांची बचत करण्यासाठी एअर इंडियाने केबिन क्रू वगळता सर्वच कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये पुढच्या तीन महिन्यांसाठी १० टक्के कपात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here