
न्यूयार्क :
जगातील जवळपास सर्वच बलाढ्य देश कोरोनापुढे हतबल झाले आहेत. असे असतानाच, आता जगातील सर्वात् श्रीमंत लोकांपैकी एक असलेले बिल गेट्स कोरोना व्हायरसवरील लस तयार करण्यासाठी अब्जावधी डॉलर खर्च करणार आहेत.
“द डेली शो”च्या होस्ट नूह यांना दिलेल्या एका मुलाखतीत गेट्स यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले, कोरोना व्हायरसच्या एकूण सात व्हॅक्सीन तयार केल्या जाणार आहेत आणि त्यातील दोन सर्वात चांगल्या व्हॅक्सीनचा प्रयोग केला जाणार आहे.
बिल गेट्स म्हणाले, आम्ही कोरोना व्हायरसवरील 7 व्हॅक्सीन तयार करत असलेल्या सर्व कंपन्यांना निधी देत आहोत. या सातही वॅक्सीन एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी तयार करण्याचे काम सुरू आहे. वेळेची बचत व्हावी हा यामागचा मुख्य हेतू आहे. व्हॅक्सीन तयार होताच त्यातील दो सर्वोत्कृष्ट व्हॅक्सीन्सची निवड करून त्याचे प्रयोग केले जातील. यापूर्वीही गेट्स यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधी रुपयांची मदत केली आहे.