मुंबई :
कोरोना व्हायरससोबत लढण्यासाठी सरकारला सहकार्य व्हावे यासाठी विविध कंपन्यांनी मदतकार्य, आर्थिक देणगी देण्यास सुरुवात केली आहे. यानुसार फेडरल बँकेनेही आपल्यावतीने या उपक्रमात सहभागी झाली असून, बँकेने आपले ग्राहक, सीएसआर विभाग आणि फाऊंडेशन यांच्या सहकार्याने विशेष उपक्रम सुरु केला आहे. फेडरल बँक पोर्टलद्वारे संकलित प्रत्येक देणगीइतकीच रक्कम, बँकेचा CSR विभाग असलेल्या फेडरल बँक होर्मिस मेमोरियल फाऊंडेशनद्वारे दिली जाईल. पोर्टलवर देणगी दिलेल्यापैकी 50% रक्कम प्राप्ती कर कायद्याच्या कलम 80G खाली वजावटीस पात्र राहील.
फाऊंडेशनद्वारे पुणे बी जे मेडिकल कॉलेजला १००० रॅपिड कोरोना चाचणी संच दान करण्यात येतील . कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे प्रभावित झालेल्या लोकांना आधार देण्याचा एक प्रयत्न म्हणून, फेडरल बँकेने आपले कर्मचारी आणि ग्राहक यांच्याकडून देणग्या गोळा करण्याची मोहिम सुरु केली आहे. बँकेने आपल्या वेबसाईटवर देणगी संकलनासाठी एक पोर्टल स्थापन केले आहे. त्यावर प्राप्त प्रत्येक अंशदानाच्या इतकी रक्कम, बँकेचा CSR विभाग असलेल्या, फेडरल बँक होर्मिस मेमोरियल फाऊंडेशनद्वारे जमा करण्यात येईल. अशाप्रकारे जमलेला निधी समुदायिक किचन पुढाकारांना आधार देण्यात आणि देशाच्या विविध भागांमध्ये Covid-19 चाचणी संच पुरवण्यात वापरला जाईल.
या फाऊंडेशनद्वारे पुणे बी जे मेडिकल कॉलेजला १००० रॅपिड कोरोना चाचणी संच दान केले जातील. कोव्हीड 19 चे रुग्ण पुण्यात अधिक संख्येनं आढळत असल्यामुळे बँकेने हा पुढाकार घेतला आहे. फाऊंडेशनने महाराष्ट्र आणि केरळसाठी रॅपिड कोरोना चाचणी संच खरेदी करिता रु.२७ लाख मंजूर केले आहेत. याची पहिली खेप १० एप्रिल रोजी पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजला पाठवली जाईल. अधिक माहिती आणि देणगी देण्यासाठी, भेट द्या www.federalbank.co.in/covid-19-donation.येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.