क्रेडिट कार्डधारकांना आरबीआयचा दिलासा…

मुंबई:
भारतीय रिझर्व्ह बॅँकेने जाहीर केलेल्या अधिस्थगनमुळे कर्जधारकांना कर्जाचे हप्ते भरण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे क्रेडिट कार्डवरील असलेली देय रक्कम आणि व्याज भरण्यासाठीही तीन महिन्यांची मुदत मिळणार आहे. भारतीय रिझर्व्ह बॅँकेने याआधी घोषणा केलेल्या अधिस्थगनाची संपूर्ण नियमावली सोमवारी जाहीर केली.  रिझर्व्ह बॅँकेने जाहीर केलेल्या सूचनांमध्ये १ मार्च ते ३१ मे दरम्यान देय असलेले कर्जाचे हप्ते, कर्जावरील व्याज, मुद्दल तसेच क्रेडीट कार्डावरील देय रक्कम यांना तीन महिन्यांची मुदतवाढ संबंधित संस्था देऊ शकतील. कॅश क्रेडीट आणि ओव्हर ड्राफ्टच्या स्वरुपामध्ये देण्यात आलेल्या खेळत्या भांडवलाचाही यामध्ये समावेश असणार आहे.
ज्या कालावधीमध्ये ही सवलत दिली जाणार आहे, त्या कालावधीचे व्याज तातडीने मुदत संपल्यावर भरावे लागणार असल्याचे रिझर्व्ह बॅँकेच्या सूचनेमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. याचात अर्थ ही कर्जमाफी नसून केवळ काही काळ कर्जाची वसुली पुढे ढकलली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कर्जदारांना पैसे जमविण्यासाठी तीन महिन्याच्या अतिरिक्त कालावधी मिळणार आहे. लॉकडाउनमुळे अनेकांना घराबाहेर पडणे शक्य होत नसल्याने तसेच उत्पन्नाचा स्त्रोत आटल्यामुळे अनेकांना आपल्या कर्जाचे देय हप्ते कसे भरावे हा प्रश्न पडला होता. त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बॅँकेने निर्णय जाहीर केला आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here