जीएसटी संकलनावर लॉकडाउनचा परिणाम 

GST, lockdown

नवी दिल्ली :
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे केंद्राच्या महसूलावर यावर्षी परिणाम होईल असे वाटत होते. आणि ते खरेच ठरले, फेब्रुवारी, जानेवारी, डिसेंबर, नोव्हेंबरनंतर पहिल्यांदाच यावर्षी मार्च मध्ये जीएसटी संकलन एक लाख कोटी रुपयांच्या खाली गेले आहे. मार्चमध्ये जीएसटीतून केवळ ९७,५९७ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. हा मार्च २०१९च्या १.०६ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत ८.४ टक्के कमी आहे.
यापूर्वी जीएसटीतून फेब्रुवारीमध्ये १.०५ लाख कोटी रुपये, जानेवारीमध्ये १.१० लाख कोटी रुपये, डिसेंबरमध्ये १.०३ लाख कोटी रुपये आणि नोव्हेंबरमध्ये १.०३ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. मार्चमध्ये ७६.५ लाख जीएसटी रिटर्न दाखल करण्यात आले. तर फेब्रुवारीमध्ये ८३ लाख रिटर्न दाखल झाले होते. याचाच अर्थ मार्चमध्ये जीएसटीच्या अनुपालनात कमतरता राहिल्या आहेत.
अर्थ मंत्रालयाने बुधवारी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, मार्च २०२० मध्ये एकूण ९७५९७ कोटी रुपयांच्या जीएसटी संकलनात केंद्रीय जीएसटीचा हिस्सा १९१८३ कोटी रुपये आहे. त्याचप्रमाणे राज्य जीएसटी संकलन २५६०१ कोटी रुपये आहे. एकीकृत जीएसटी संकलन ४४५०८ कोटी रुपये राहिला. यामध्ये नियमित निपटाऱ्या अंतर्गत एकीकृत जीएसटी तून केंद्रीय जीएसटीला १९७१८ कोटी रुपये आणि राज्य जीएसटी अंतर्गत १४९१५ कोटी रुपये जारी केले आहेत. संपूर्ण आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये देशांतर्गत व्यवहारातून प्राप्त जीएसटी मागील वर्षीच्या तुलनेत ८ टक्के जास्त आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here