‘जी-२०’ अर्थमंत्र्यांची १५ रोजी बैठक

G20
G20

नवी दिल्ली :
कोरोना संसर्गामुळे संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थांना वाचवण्यासाठी नेमकी कोणती पावले उचलावीत, यावर जी-२० देशांचे अर्थमंत्री १५ तारखेला चर्चा करणार आहेत. ‘या व्हर्च्युअल मिटिंग’मध्ये भारतातर्फे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास सहभागी होणार आहेत.
१५ एप्रिल रोजी होणारी ही अर्थमंत्र्यांची बैठक ३१ मार्च रोजीच्या बैठकीतील सूत्र पुढे घेऊन जाणारी असेल. या बैठकीनंतर १७ तारखेला जी-२० गटातील देशांच्या ऊर्जामंत्र्यांची विशेष बैठकही पद्धतीने होणार आहे. विविध पतमानांकन संस्थांनी जवळपास सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थांचे पतमानांकन घटवले आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते, कोरोनामुळे जगात महामंदी येणार आहे. भारताचा विकासदर ३० वर्षे मागे जाणार असून, तो २०२०-२१ साठी २ टक्के राहील, असा अंदाज आहे.
३१ मार्च रोजी झालेल्या बैठकीत निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढण्यासाठी आर्थिक प्रणालीचे महत्त्व अधोरेखित केले होते. त्याचप्रमाणे त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला कोव्हिड १९ संबंधित आर्थिक गरजा भागवण्यासाठी काही योजना तयार करण्याचा सल्लाही दिला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here