‘नेक्स्ट एज्युकेशन’ने सुरु केली आभासी शाळा

virtual school

मुंबई :

कोव्हीड-१९च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक क्षेत्रात उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेत भारतातील अग्रगण्य शिक्षण समाधान प्रदाता नेक्स्ट एज्युकेशन इंडिया प्रा.लि.ने शाळांची मदत करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. शिक्षणाची प्रक्रिया ऑफलाइन वरून ऑनलाइनवर आणण्याकरिता नेक्स्ट लर्निंग प्लॅटफॉर्म, दूरवरून शिक्षणासाठी तसेच शैक्षणिक प्रक्रिया सुरळीत चालू राहण्यासाठी ‘स्कूल इन अ बॉक्स’ सोल्युशन हा सर्वसमावेशक पर्याय उपलब्ध करून देतो. नेक्स्ट एज्युकेशन ३० एप्रिल २०२० पर्यंत सर्व भागीदार शाळांसाठी फ्री सबस्क्रिप्शनची सुविधा देत आहे.

केजी ते १२ वी पर्यंतचे शैक्षणिक वातावरण अधिक संवादात्मक, सर्जनशील आणि आकर्षक बनवण्यासाठी नेक्स्ट एज्युकेशन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यासाठी नेक्स्ट लर्निंग प्लॅटफॉर्म, नेक्स्ट ईआरपी, लाइव्ह लेक्चर्ससह नेक्स्ट एमएस, नेक्स्ट असेसमेंट, घरी राहून कंटेंट मिळवणे, संबंधित राज्याच्या बोर्डाचा कंटेंट स्थानिक तसेच विविध भाषांमध्ये उपलब्ध असणे आदी सुविधांचा लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये समावेश असेल.
लाइव्ह लेक्चर्सद्वारे शिक्षक दूरवरून शिकवण्याकरिता इंटरनेटचा वापर करून व्हर्च्युअल क्लासरूम तयार करू शकतात. विद्यार्थ्यांना यासंबंधी रिअलटाइम नोटीफिकेशन्स मिळतात तसेच रेकॉर्डेड सेशन्स त्यांना अनेकवेळा पाहताही येतात. शिक्षकांना ऑनलाइन डाउट सेशन्सही घेता येऊ शकतील. नेक्स्ट असेसमेंट हे अत्यंत शक्तीशाली टूल असून याद्वारे शिक्षक ऑटोमॅटिक असेसमेंट जनरेटरने असेसमेंट तयार करू शकतात. अडॅप्टीव्ह टेस्ट घेऊन विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या फीडबॅकही देता येऊ शकतो. आमचा पुरस्कारप्राप्त डिजिटल कंटेंट हा नेक्स्ट करिकुलम आणि टीचनेक्स्ट कंटेंटनी युक्त आहे. डिजिटल कंटेंट हा आयसीएसई, सीबीएसई, आयजीसीएसई आणि २९ स्टेट बोर्डाच्या ७ भाषांमध्ये उपलब्ध आहे.
डोंबिवलीतील पवार पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल इशिता चौधरी म्हणतात, ‘ सध्याच्या संकट काळात आमचे शिक्षक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लेसन्स आणि वर्कशीट शेअरिंगची तयारी करत आहेत. नेक्स्ट एज्युकेशनचे ऑनलाइन क्लासेस आणि प्रत्येकाच्या घरी फ्री कंटेंट अॅक्सेस मिळाल्याने शिक्षणात निश्चितच सुरळीतपणा येईल. क्लासरुम लर्निंगच्या माध्यमातून डिजिटल लर्निंग टूल प्रत्येकाच्या हाती पोहोचले पाहिजे.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here