‘महिंद्रा’सोबत आता ‘जॉय ऑफ लर्निंग’

मुंबई :
महिंद्रा लाइफस्पेसेसने ग्राहक, निवासी, चॅनल पार्टनर व कर्मचारी यांच्यासाठी मीडिया-आधारित ऑनलाइन लर्निंग कण्टेण्ट व सेवा विशेष दरामध्ये उपलब्ध करण्यासाठी एक्स्ट्रॉमार्क्स एज्युकेशन या आघाडीच्या जागतिक एड-टेक कंपनीशी भागीदारी केली आहे. लॉकडाउन सुरू असूनही सुरळित सुरू असलेल्या उपक्रमांमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने घरच्या घरी शिक्षण याचाही समावेश आहे. तसेच, परिणामकारक व आनंदी शिक्षणासाठी योग्य वातावरण गरजेचे आहे. यापासून प्रेरणा घेऊन, भारतातील एखाद्या कॉर्पोरेट रिअल इस्टेट विकसकाने राबवलेला अशा प्रकारचा हा पहिलावहिला उपक्रम आहे.
या विशेष उपक्रमाचा भाग म्हणून, भारतभरातील महिंद्रा लाइफस्पेसेस कुटुंबांना एक्स्ट्रामार्क्सच्या ऑनलाइन लर्निंग प्रोग्रॅम व मोड्युलवर 50% पर्यंत सवलत मिळवता येईल, तसेच दर पंधरवड्याला फ्री ट्रायल व्हाउचर व कुपन मिळवता येतील. एक्स्ट्रामार्क्स विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सर्व टप्प्यांमध्ये साथ देते – प्री-स्कूल, शालेय शिक्षण (किंडरगार्टन ते बारावी, आणि सर्व विषयांचा समावेश) व स्पर्धा परीक्षांची तयारी (JEE, NEET, इ.).  एक्स्ट्रामार्क्सचे लर्निंग अॅप, टेस्ट अॅप व लाइव्ह डिजिटल क्लासेस केव्हाही, कोठूनही शिक्षण घेण्याचा उत्तम अनुभव देतात. 

महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लि.चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद सुब्रमण्यन म्हणाले, “ग्राहकांच्या सातत्याने बदलत्या गरजांची आम्ही तपशीलवार दखल घेत असतो. त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये सध्या घर हे केंद्रस्थानी आहे. जीवनाची एकंदर गुणवत्ता वाढवण्यासाठी आम्ही देणार असलेल्या निरनिराळ्या सेवांद्वारे दीर्घकाळात सर्वांना अविस्मरणीय सेवा देण्यासाठी आम्हाला  एक्स्ट्रामार्क्सबरोबरची भागीदारी अतिशय उपयुक्त ठरणार आहे.” 
एक्स्ट्रॉमार्क्सल एज्युकेशनचे संस्थापक व सीएमडी अतुल कुलश्रेष्ठ यांनी सांगितले, “महिंद्रांचा परिवारात जॉय ऑफ लर्निंग पसरवण्यासाठी एक्स्ट्रामार्क्सला महिंद्रा लाइफस्पेसेसशी भागीदारी करताना अतिशय आनंद होत आहे. निर्मिती झाल्यापासून एक्स्ट्रामार्क्सने केव्हाही, कोठूनही शिक्षण पूर्णतः उपलब्ध करण्याबरोबरच, विद्यार्थ्यांना आनंदी व धमाल अनुभव देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून, एक्स्ट्रामार्क्सची विचारसरणी अधिकाधिक घरांपर्यंत पोहोचेल आणि 2020 या वर्षातील उरलेल्या कालावधीमध्ये आम्हाला नवी उमेद मिळेल, अशी अपेक्षा आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here