‘मानसिक आरोग्याचा करा गंभीर विचार’

मुंबई:
भारतात असलेल्या मानसिक आरोग्य समस्यांची उच्च संख्या विचारात घेऊन विशेषत: आजच्या या भयंकर महामारीच्या काळाचा विचार करत, फ्युचर जेनेराली इंडिया इंश्युरन्स कंपनी लिमिटेड (एफजीआयआय) टोटल हेल्थ स्कोर नावाच्या ऑनलाइन मानसिक आरोग्य परिक्षण चाचणीच्या परिचयाची घोषणा केली आहे. या अतिशय आगळ्यावेगळ्या स्वयं-परिक्षणामुळे व्यक्तीला आपल्या मानसिक हिताचे मूल्यांकन करता येईल. एफजीआयआय प्रत्येकाला आपल्या मानसिक आरोग्याचा गंभीरपणे विचार करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे, त्याचप्रमाणे व्यक्तीला आंतरबाह्यदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी शारिरीक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य देखील तेवढीच महत्वाची भूमिका बजावते या मुद्द्यावरसुद्धा कंपनीने विशेष जोर दिला आहे.
टोटल हेल्थ स्कोर ही एक प्रश्नावली तसेच एपीआयवर आधारीत परिक्षण आहे, ज्याची रचना कार्यरत असलेल्या थेरपिस्ट व काउन्सलर्सद्वारे करण्यात आली आहे, या लोकांना संभाव्य मानसिक आरोग्य समस्यांच्या आरंभिक लक्षणांची कल्पना असते. एकदा व्यक्तीने हे परिक्षण पूर्ण केले की, त्याला/तिला गुण देण्यात येतील. हे गुण त्याच्या/तिच्या मानसिक आरोग्याची आजमितीची स्थिती समोर मांडतील. या व्यतिरिक्त त्याला/तिला तणाव, चिंता, नैराश्य व इतर संबंधित मुद्द्यांसारख्या विविध मानसिक समस्यांना समजून घेण्यासाठी तसेच त्यांना व्यवस्थापित करण्यासाठी ऍक्सेस मिळेल. स्वत:च्या देखभालीबाबतची सामुग्री मानसिक आरोग्य तज्ञांनी खास फ्युचर जेनेरालीसाठी विकसीत केली आहे.

अनुप राऊ, एमडी आणि सीइओ, फ्युचर जेनेराली इंडिया इंश्युरन्स म्हणाले,”आमच्या ग्राहकांचे जीवनभराचे भागीदार बनणे आणि मानवी दृष्टिकोन असलेली निपुणता दाखवणे हे आमचे धेय्य आहे. जर आम्ही भारताच्या सांस्कृतिक आदर्शांना व निर्बंधांना समजू शकलो त्याचप्रमाणे काही कठिण संवाद घडवून आणू शकलो तरच आम्ही आमचे धेय्य पूर्ण करु शकू. मानसिक आरोग्याला एखाद्या निषिध्द गोष्टीप्रमाणे समजले जाते याची आम्हाला कल्पना आहे. ब्रँड म्हणून आम्हाला मानसिक आरोग्याच्या संदर्भात उपयुक्त ठरतील अशा चर्चा घडवून आणायच्या आहेत व लोकांचा त्याबद्दल असलेला दृष्टिकोन बदलायचा आहे. दृष्टिकोनातल्या बदलाचा सर्वप्रथम मुद्दा म्हणजे मानसिक आरोग्य, शारिरीक आरोग्याएवढेच महत्वाचे आहे हे लोकांना समजावून देणे, त्याचप्रमाणे त्यांना त्याच्या मूल्यमापनाचे पुरेसे मार्ग उपलब्ध करुन देणे होय. त्यामुळे आम्ही टोटल हेल्थ स्कोर तयार केला आहे, ही एक सोपी प्रश्नावली आणि एपीआयवर आधारीत स्कोर आहे जो तुम्हाला चाचणी घेतेवेळी तुमच्या मानसिक आरोग्याला निर्धारीत करण्यात मदत करतो.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here