मारुती सुझुकी देणार दरमहा १०,००० मोफत व्हेंटिलेटर्स

maruti-suzuki-will-manufacture-10000-ventilators-per-month

​नवी दिल्ली:
​वाहन निर्मितीतील देशातील मोठी कंपनी असलेल्या मारुती सुझुकी इंडियाने करोनाविरुद्धच्या लढाईत भाग घेतला आहे. कंपनीकडून व्हेंटिलेटर्सची निर्मिती केली जाणार आहे. यासाठी मारुती सुझुकी इंडियाने ‘अग्वा हेल्थकेअर’ या कंपनीशी भागीदारी केली आहे. दरमहा १० हजार व्हेंटिलेटर्स निर्मितीचे लक्ष्य कंपनीने ठेवले असून हे व्हेंटीलेटर्स सुविधा मारुती सुझुकीकडून ‘अग्वा हेल्थकेअर’ला  निशुल्क देण्यात येणार आहे. ​
‘अग्वा हेल्थकेअर’ मान्यताप्राप्त व्हेंटिलेटर्स उत्पादक आहे. व्हेंटिलेटर्स निर्मितीची व्यवस्था ‘अग्वा हेल्थकेअर’ येथेच करण्यात आल्याचे मारुती सुझुकीने म्हटलं आहे. यामध्ये मारुती सुझुकी त्यांच्या पुरवठादारांकडून व्हेंटिलेटर्ससाठी आवश्यक सुटे भाग तसेच त्यांचा अनुभव आणि गुणवत्ता यासाठी योगदान देणार आहे. व्हेंटिलेटर्स निर्मितीसाठी आर्थिक तरतूद करणे , उत्पादन वाढवण्यासाठी आवश्यक परवानगी मिळवण्यासाठी मारुती सुझुकीकडून प्रयत्न केले जाणार आहेत. मारुतीचा संयुक्त उद्यम असलेल्या कृष्णा मारुती लिमिटेडकडून मास्क निर्मिती केली जात आहे. यासाठी अशोक कपूर यांच्याशी भागीदारी करण्यात आली आहे. हे मास्क हरियाणा सरकारला पुरवले जाणार आहेत.​

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here