लॉकडाउनसाठी जिओकडून खास इंटरनेट प्लान

jio-internet

मुंबईः
कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी सरकारनं काही उपाययोजना राबवल्या आहेत. देशभरात काही राज्यांमध्ये लॉकडाऊनची स्थिती बघता बीएसएनएलनं वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहित करण्यासाठी फ्री बॉडबँड सेवा लॉन्च केली आहे. त्यानंतर रिलायन्स जिओनं आपल्या सर्व यूजर्ससाठी 251 रुपयांत वर्क फ्रॉम होम प्लान लॉन्च केला आहे. 251 रुपयांमध्ये रिलायन्स जिओ वर्क फ्रॉम होम प्लानमध्ये दरदिवशी 2GB डेटा मिळतो आणि हा प्लान 51 दिवसांसाठी वैध आहे.
ही स्कीम पूर्णपणे इंटरनेट वापरण्यासाठी आहे आणि यात कोणतीही कॉलिंग किंवा एसएमएस सुविधा नाही आहे. या प्लानच्या अंतर्गत सब्सक्राइबर एकूण 120 GB हाय स्पीड डेटाचा वापर करु शकतील. एकदा हाय स्पीड डेटा संपल्यानंतर यूजर्सला 64 kbps चा स्पीड मिळेल.
जिओनं आपले काही 4G वाउचर मोडिफाइड केला आहे आणि त्याचे डेटा बेनिफिट्स दुप्पट केलं आहे. रु. 11, रु.21, रु. 51 आणि रु. 101 प्रीपेड प्लान आता दुप्पटीनं अधिक डेटा देत आहेत. 11 रुपये असलेला पॅक जो आधी 400 MB डेटा देत होता आता 800 MB डेटा देत आहे आणि 75 मिनिटं जिओ टू अन्य नेटवर्क कॉलिंग बेनिफिट्सवर येतो. 21 रुपयांचा प्रीपेड 2GB डेटासोबत 200 मिनिटं जिओ टू जिओ कॉलिंगची सुविधा देखील आहे. या टॉप अप योजना आहेत ही वस्तुस्थिती लक्षात घेता या योजनांची वैधता संपूर्णपणे वापरकर्त्यांच्या विद्यमान योजनांवर अवलंबून असेल.
51 रुपयांचा डेटा बूस्टर पॅक, याधी एकूण 3GB डेटा सादर केला होता. आता 500GB जिओ टू अन्य नेटवर्क फायद्यासोबत 64 GB डेटा प्रदान करतो. 101 रुपयांचा एकूण 6GB डेटा देणारा प्लान आता एकूण 12 GB डेटासोबत येतो. हा पॅक 1000 मिनिटं जिओ टू अन्य नेटवर्कही येतो. जेव्हा आपण आपल्या विद्यमान प्लानचा इंटरनेट डेटा संपवतात तेव्हा हा प्लान उपयुक्त आहे. आपण नेहमीच या प्लानसह रिचार्ज करू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here