वर्ल्ड बँकेचे भारताला ‘भरघोस’ अर्थ सहाय्य

world-bank-approves-1-billion-dollar-emergency-help-india-fight-corona

वॉशिंग्टन :
कोरोनावर मात करण्यासाठी वर्ल्ड बँकेने भारताला एक अब्ज डॉलरच्या आपत्कालीन अर्थ सहाय्यता निधीसाठी मंजुरी दिली आहे. वर्ल्ड बँकेच्या सहाय्यता योजनेतून १.९ अब्ज डॉलरच्या पहिल्या टप्प्यात २५ देशांची मदत केली जाणार आहे. वर्ल्ड बँकेच्या कार्यकारी संचालक मंडळाने जगभरातील विकसनशील देशांसाठी आपत्कालीन सहाय्यता योजनेच्या पहिल्या टप्प्यात मंजुरी दिली. त्यानंतर वर्ल्ड बँकेने सांगितले की, “भारतात एक अब्ज डॉलरच्या आपत्कालीन अर्थ सहाय्यता निधीतून कोरोनावर मात करण्यासाठी चांगले स्क्रीनिंग, कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे, वैद्यकीय तपासणी प्रयोगशाळा, व्यक्तीगत सुरक्षा उपकरणे खरेदी करण्यासाठी मदत मिळेल.”  वर्ल्ड बँकेकडून आपत्कालीन अर्थ सहाय्यता निधीतून सर्वाधिक निधी म्हणजे एक अब्ज डॉलर भारताला दिला जाणार आहे.
दरम्यान, दक्षिण आशियात वर्ल्ड बँकेने पाकिस्तानसाठी २० कोटी डॉलर, अफगानिस्तानसाठी १० कोटी डॉलर, मालदीवसाठी ७३ लाख डॉलर आणि श्रीलंकेसाठी १२. ८६ कोटी डॉलरची सहाय्यता करण्यास मंजुरी दिली आहे. याचबरोबर, वर्ल्ड बँकेने म्हटले आहे की, जगभरातील कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी १५ महिन्यांच्या दृष्टीने १६० अब्ज डॉलरच्या आपत्कालीन सहाय्यता निधीच्या योजनेला मंजुरी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here