सिम्फनी करणार इको फ्रेंडली पद्धतीने हवा गार


मुंबई :
हवामान अहवालानुसार, 2020 हे वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष मानले गेले. तापमानात होणारी वाढ, मानवनिर्मित ग्लोबल वॉर्मिंग, पृथ्वी आणि ग्रहाच्या स्त्रोतांच्या संरक्षणार्थ उपाययोजनांची वानवा, याचे भयंकर पडसाद पुढील पिढ्यांवर उमटणार आहेत. त्यातच घरांमधील वातानुकूलित यंत्र म्हणजे एअर कंडीशनरच्या बेजबाबदार वापरामुळे संपूर्ण परिसंस्थेला तीव्र धोका उत्पन्न झालेला आहे. सर्वांनी सद्यस्थितीचा रिअॅलिटी चेक घेऊन आपल्या पृथ्वीचा बचाव करण्याच्या दिशेने उपाययोजना अंगीकारणे आवश्यक ठरते. 14 डिसेंबर’च्या ‘जागतिक ऊर्जा संवर्धन दिनी’ सिंफनी लिमिटेडचे सीएमडी अचल बकेरी यांनी पर्यावरणस्नेही पद्धतीने घरातील वातावरण गार करून ऊर्जा संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले.   
घरातील वातावरण गार करण्यासाठी एअर कंडीशनरचा पर्याय सर्वाधिक सुलभ मानला जातो. त्यामुळे खोलीतील वातावरण सुसह्य होत असले, तरी उपकरणातून निघणाऱ्या धोकादायक उत्सर्जनामुळे वैयक्तिक आरोग्यासोबतच विघातक जागतिक परिणामांना सामोरे जावे लागते आहे. एअर कंडीशनरमध्ये हानिकारक रेफ्रिजरंट जसे की, क्लोरोफ्लूरोकार्बन्स (सीएफसी) तसेच हायड्रोफ्ल्यूरोकार्बन्स (एचएफसी) या ओझोन थराला अपायकारक असणाऱ्या घटकांचा समावेश असतो. दुसरीकडे, एअर कुलर्समध्ये रेफ्रिजरंट म्हणून पाण्याचा वापर होत असल्याने ते पर्यावरणस्नेही मानले जातात. एअर कंडीशनरमधून कायम तीच-तीच हवा खोलीत फिरत राहते. तर एअर कुलर हे घराबाहेरील शुद्ध हवा घरात खेळती ठेवण्याचे काम करतात. त्यामुळे खोली शुद्ध आणि फिल्टर करण्यात आलेल्या हवेने गार होते. एअर कंडीशनिंगपेक्षा एअर कुलिंग हा पर्याय कसा फायदेशीर आहे, ते खाली नमूद करण्यात आले आहे.


हरीत उत्पादन: एअर कुलर्स हे हरीत उत्पादन आहे. एअर कंडीशनरप्रमाणे एअर कुलर हे ग्लोबल वॉर्मिंग तसेच अन्य पर्यावरण-संबंधी समस्यांना जबाबदार असलेल्या हानिकारक वायू उत्सर्जनाची निर्मिती करत नाहीत.
ऊर्जाक्षम: एअर कुलर्स हे एसीच्या तुलनेत 10 पट कमी वीज वाचवतात. तसेच कमी वोल्टेज असतानाही कार्यरत राहतात.
अल्प देखभाल: एअर कुलर्सना फारशा देखभालीची आवश्यकता नसते; एसीच्या तुलनेत एअर कुलर्सना क्वचितच देखभालीची गरज असते.
पर्यावरणस्नेही: एअर कुलर्समधून हानिकारक स्वरुपाच्या क्लोरोफ्ल्यूरोकार्बन्स (सीएफसी) उत्सर्जन होत नसल्याने महत्त्वाचे पर्यावरणसंबंधी फायदे आहेत. ग्रीन कुलिंग सोल्यूशन विजेची बचत करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here