‘स्थानिकांना देणार परवडणारी घरे’

पणजी :
देशातील आघाडीची रिअल इस्टेट कंपनी, पे्रस्टिज इस्टेट्स प्रोजेक्ट लि.ने आता गोव्यातही आपला प्रवेश केला असून, दोना पावला येथे ‘प्रेस्टिज ओशन क्रेस्ट’ या प्रीमियम निवासी प्रकल्पासह त्यांनी राज्यात शुभारंभ केला.
मथायस कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासह सुरु करण्यात आलेल्या या नव्या प्रकल्पामध्ये 106 अपार्टमेंटस्, 7 दुकाने आणि समुद्रीय नजारा असणार्‍या उपहारगृहाचा समावेश असणार आहे. या समारंभात प्रोजेक्टचे अनेक सहाय्यक, प्रेस्टिज इस्टेट्सचे कर्मचारी आणि मथायस कन्स्ट्रक्शनचे ज्येष्ठ सदस्य होते. हा प्रकल्प फेब्रुवारी 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची अपेक्षा आहे.
प्रेस्टिज ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक इरफान रझाक म्हणाले की, गोव्यामध्ये प्रीमियम निवासी प्रकल्प तयार करण्यासाठी आम्ही मथायस कॉन्ट्र्यूक्शन्ससह भागीदारी केल्याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत. या भागीदारीत प्रचंड क्षमता आहे आणि आम्ही पुढच्या प्रवासाबद्दल खूप उत्सुक आहोत. आम्ही मथायस संघाबरोबर एक महत्त्वपूर्ण प्रकल्प तयार करण्यासाठी आणि स्थानिकांना परवडणारी घरांची ऑफर देण्याच्या दृष्टीने काम करण्याची आमची अपेक्षा आहे.

मथायस कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक जो मथायस म्हणाले की, प्रेस्टिजसारख्या गतासोबतच्या सहयोगाचा आम्हाला फार आनंद झाला आहे, हा विश्वास, सचोटी आणि गुणवत्तेवर हे नाते आहे. आम्ही त्यांची शाश्वत विकासाची वचनबद्धता कायम ठेवत दोनापावलाच्या प्रतिष्ठित ठिकाणी जागतिक स्तरीय निवासी प्रकल्प आणण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here