१५ पासून उडणार ‘एअर आशिया’, बुकिंग केले सुरु

नवी दिल्ली :
देशातील एक प्रमुख विमान कंपनी असलेल्या एअर एशियाने १५ एप्रिलपासूनचे बुकिंग सुरु केले आहे. जोपर्यंत डीजीसीएडून याबाबत येणाऱ्या दिशा निर्देशावर अवलंबून असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणास १४ एप्रिलपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे बहुतांश विमा कंपन्यांनी १५ एप्रिलनंतरचे बुकिंग सुरु केले आहे. दरम्यान, शुक्रवारी एअर इंडियाने ३० एप्रिलपर्यंत बुकिंग न करण्याची घोषणा केली होती. एअर एशियाने पीटीआय-भाषा या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले की, प्रवासी १५ एप्रिलनंतर आपले तिकीट बुक करु शकतील. पण डीजीसीएच्या सूचनेनंतर यात बदल होऊ शकतो. नागरी हवाई उड्डाण सचिव प्रदीपसिंह खरोला यांनी विमान कंपन्या १४ एप्रिलनंतर तिकीट बुक करु शकतील असे म्हटले होते.
लॉकडाऊनदरम्यान विमान कंपन्यांची नजर सरकारच्या निर्णयावर टिकून आहे. कारण १४ एप्रिलला लॉकडाऊन संपणार की नाही हे सरकारवर अवलंबून आहे. त्यामुळेच कंपन्यांना डीजीसीएच्या सूचनांची प्रतीक्षा आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे २४ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत देशात विमान, रेल्वे, मेट्रो, बस आणि टॅक्सीसह इतर वाहतूक सुविधा बंद आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here