4 महिन्यात स्टेपॲपचे 2 मिलियन डाउनलोड 

stepapp

मुंबई : 
​​नवे प्रयोग, व्यवसायवृद्धी या संदर्भात जवळपास सर्वच क्षेत्र निश्चल स्थितीत असताना लॉकडाऊनने एज्यु-टेक क्षेत्राच्या वाढीला नकळत चालना दिली आहे. वाढती मागणी आणि गरजा लक्षात घेऊन टेक-एज्युकेशन कंपन्या सातत्याने त्यांची व्यवसाय क्षितिजे रुंदावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सवलतीच्या दरात ॲप उपलब्ध करून देण्यापासून अभ्यासक्रमात नवे घटक देत त्यांची व्याप्ती वाढवणे अशा अनेक उपक्रमांतून एज्यु-टेक कंपन्या या संकटकाळात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ठरलेल्या साच्यापलिकडे जात आहेत.
स्टेपॲप (stepapp) या एज्यु-टेक क्षेत्रातील एका उदयोन्मुख कंपनीने वापरकर्ते आणि डाऊनलोड्सच्या वाढत्या संख्येच्या माध्यमातून हि संधी ​शोधली आहे. स्टेपॲप  (stepapp) या गेमिफाइड लर्निंग अॅपच्या वापरकर्त्यांमध्ये 15 मार्चपासून तीन लाखांहून अधिक वापरकर्त्यांची भर पडली आहे. मागील चार महिन्यांत प्लेस्टोअर आणि अॅपस्टोरमधून या ॲपचे एकूण 2 मिलीयन डाऊनलोड झाले आहेत.
stepapp
असा सुरु करता येईल स्वत:चा ‘डिजिटल इव्हेंट’

​लवकरच सर्व शैक्षणिक बोर्ड येणार stepapp ​वर  :

लॉकडाऊनच्या काळात स्टेपॲप  (stepapp) हा विद्यार्थ्यांना सीबीएसई, आयसीएसई आणि एसएससी बोर्डानुसार गणित आणि विज्ञानाच्या संकल्पना गेमिफाइड पद्धतीने शिकण्यासाठीचा एक प्राधान्यक्रमाचा पर्याय ठरत आहे. मागील काही महिन्यांमध्ये गेमिफाइड लर्निंग पद्धतींना बरीच लोकप्रियता लाभली आहे. स्टेपॲपने नव्या विषयांसह हे ॲप नव्या स्वरुपात सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा परिणामकारक दृष्टिकोन बाळगत या ॲपवर शैक्षणिक बोर्डाच्या नियमांनुसार सोशल सायन्स आणि भाषा विषय यात समाविष्ट केले जाणार आहेत. नव्याने सादर करण्यात आलेले विषय लवकरच सीबीएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होतील. इतर शैक्षणिक बोर्डांसाठीही अभ्यासक्रम तयार करण्याची प्रक्रिया या ॲपने सुरू केली आहे.
सेग्रिगेटेड टॉपिक म्हणजेच प्रत्येक धड्यातील विभागवार मुद्द्यांसारख्या या ॲपवरील सुविधांमुळे विद्यार्थ्यांना संकल्पना अगदी सहज समजून घेता येतात आणि त्यांचा सराव करता येतो.सिम्प्लिफाइड टेस्टिंग मेथडॉलॉजीमुळे विद्यार्थ्याची प्रगती जाणून घेता येते आणि डॅशबोर्डमुळे नोंदणी केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती गोळा केली जाते आणि आता यात नव्या विषयांचीही भर पडणार आहे.
“मागील 22 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्राचा भाग असल्याने आमचे उद्दिष्ट आहे प्रत्येक विद्यार्थ्याला उत्कृष्ट शिक्षण देणे. मागील काही महिन्यांत आमच्या अॅपला मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद लक्षात घेता सर्व विषय समाविष्ट करून या गरजेच्या काळात विद्यार्थी आणि शिक्षकांना ते उपलब्ध करून देणे ही आमची जबाबदारी आहे. म्हणून, जेव्हा परिस्थिती आमच्यासाठी फारशी अनुकुल नसेल तेव्हाही आमची टीम उत्कृष्ट तंत्रज्ञानाचा वापर करत ॲप अधिक नाविन्यपूर्ण, सुधारित स्वरुपा उपलब्ध व्हावे, यासाठी काम करत असते,” असे एज्युइजफन टेक्नॅलॉजीस (स्टेपॲप)चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक, पेस- आयआयटी ॲण्ड मेडिकलचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण त्यागी म्हणाले.
stepapp
गुंतवणूक आणि उद्योगजगताच्या अधिक महितासाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here