कच्च्या तेलाच्या किंमतीत २० टक्क्यांची वाढ

मुंबई :
ओपेक अर्थात ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलिअम एक्सपोर्टिंग कंट्रीजने आक्रमकरित्या उत्पदनात कपात केल्याने गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या किंमतीत २० टक्क्यांची वाढ झाल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे नॉन अॅग्री कमोडिटीज व करन्सीजचे मुख्य विश्लेषक प्रथमेश माल्या यांनी सांगितले. ओपेकने कच्च्या तेल्याचे उत्पादन १ मे २०२० पासून दिवसाला ९.७ दशलक्ष बॅरलने कमी केले आहे.
सौदी अरेबियाने कच्च्या तेलाची निर्यात दहा वर्षांमधील सर्वात कमी पातळीवर केली आणि कच्च्या तेलाची अधिकृत विक्री किंमत (ओएसपी) वाढवली. या उद्योगात सर्वात महत्त्वाचा वाटा हवाई आणि रस्ते वाहतुकीचा असताना त्यावर निर्बंध आल्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतींवर मोठा परिणाम झाला आहे.

सोने आणि कच्च्या तेलाच्या किंमतीत सुधारणा

गेल्या आठवड्यात, प्रमुख अर्थव्यवस्थांची स्थिती कमकुवत झाल्याने सोन्याच्या किंमतींना आधार मिळाला व स्पॉट गोल्डच्या किंमती १.२ टक्क्यांनी वाढल्या. तेलाच्या किंमतीत झालेली सुधारणा आणि लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिलतेमुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली. अमेरिकन डॉलर वाढल्यामुळे इतर चलनधारकांना सोने महाग पडत असल्याने पिवळ्या धातूच्या किंमतीवर मर्यादा आल्या आहेत.
मागील आठवड्यात स्पॉट सिल्व्हरच्या किंमती २.८६ टक्क्यांनी वाढून १५.५ डॉलर प्रति औसांवर पोहोचल्या. एमसीएक्सवरील किंमतही ५.६ टक्क्यांनी वाढून ४३,२९३ रुपये प्रति किलोवर बंद झाली.
अर्थ जगतातील बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आमचे युट्यूब चॅनेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here