‘या’ विमा योजनेतील २७६ कोटीचे दावे मान्य

मुंबई :
फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्सतर्फे प्रधानमंत्री फसल बिमा योजनेतील शेतकऱ्यांचे २७६ कोटींचे दावे मान्य करण्यात आले आहेत. यात महाराष्ट्रातील पाच जिल्हांमधील शेतकऱ्यांचा समावेश आहे .
या योजनेमुळे एक लाख ६४ हजार ९१७ कर्जदार शेतकऱ्यांचा, तर ८५ हजार ४६० बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे. महाराष्ट्र्रात अहमदनगर, बुलढाणा, नांदेड, सातारा, आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांची पीकविम्याची रक्कम मिळाली. कर्नाटकातील सात जिल्हांमधील, राजस्थानमधील सहा जिल्हांमधील शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली आहे.
आता असंघटित क्षेत्रातील कामगारांनाही विमा संरक्षण

यात ३८ हजार ९२८ महिला शेतकऱ्यांना ४४ कोटी ३२ लाख रुपये थेट लाभार्थी खात्यात मिळाले. महाराष्ट्रातील २८ हजार ५९७ शेतकऱ्यांना २३ कोटी ९६ लाख रुपये देण्यात आले.
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here