जनधन योजनेत वाटले 31 कोटी रुपये

jandhan

 नवी दिल्ली :
कोविड -१९ मुळे घोषित लॉकडाऊनच्या प्रभावापासून संरक्षण करण्यासाठी. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 26 मार्च 2020 रोजी जाहीर केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज (पीएमजीकेपी) अंतर्गत 33 कोटीहून अधिक गरीब लोकांना डिजिटल पेमेंट सुविधेचा वापर करून 22 एप्रिल 2020 पर्यंत 31,235 कोटी रुपयांची आर्थिक मदत थेट देण्यात आली.पीएमजीकेपीचा एक भाग म्हणून, सरकारने महिला आणि गरीब ज्येष्ठ नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना मोफत अन्नधान्य आणि रोख रक्कम जाहीर केली.

या पॅकेजच्या वेगवान अंमलबजावणीवर केंद्र आणि राज्य सरकारांकडून सातत्याने देखरेख ठेवली जात आहे. अर्थ मंत्रालय, संबंधित मंत्रालये, कॅबिनेट सचिवालय आणि पंतप्रधान कार्यालय लॉकडाउनच्या अनुषंगाने गरजूंपर्यंत मदतपर उपाययोजना त्वरित पोहचवण्यासाठी कुठलीही कसर सोडत नाही.प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत 22 एप्रिल 2020 पर्यंत  पुढील आर्थिक सहाय्य (रोख रक्कम) लाभार्थ्यांना देण्यात आले आहे.
लाभधारकांना जलद आणि कार्यक्षम हस्तांतरणासाठी फिन्टेक आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी), म्हणजे  रक्कम थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा होते,  गळती दूर होते आणि कार्यक्षमता सुधारते. यामुळे लाभार्थ्याला प्रत्यक्ष बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही, लाभार्थ्याच्या खात्यात पैसे थेट जमा होतात.
jandhan
डॉक्टर्स करताहेत ‘ट्रेल’वरून ‘कोरोना’ मार्गदर्शन

jandhan योजनेचा तपशील :

योजनालाभार्थ्यांची संख्याहस्तांतरित रक्कम
पीएमजेडीवाय महिला खातेदारांना सहाय्य20.05 कोटी (98%)10,025 कोटी
एनएसएपीला सहाय्य  (वृद्ध विधवा, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक)2.82 कोटी (100%)1405 कोटी
पीएम -किसान अंतर्गत शेतकर्‍यांना फ्रंट लोडेड पेमेंट8 कोटी (out of 8 कोटी)16,146 कोटी
इमारत आणि अन्य  बांधकाम मजुरांना मदत2.17 कोटी3497 कोटी
ईपीएफओमध्ये 24% योगदान0.10 कोटी162 कोटी
एकूण33.14 कोटी31,235 कोटी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here