‘गरिबांसाठी खर्च करावे लागणार ६५ हजार कोटी’

poor, rajan

नवी दिल्ली :
संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत आहे. मात्र संकटातही संधी असू शकते. कोरोनानंतर काही देशांना पुढे जाण्याची संधी मिळू शकते. उद्योग, पुरवठा साखळीत भारताला बराच वाव आहे. मात्र त्याआधी लॉकडाऊन संपवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करायला हवेत. लॉकडाऊन संपवायचा असल्यास आपल्याला दररोज २० लाख चाचण्या घ्याव्या लागतील. अमेरिकेपेक्षा चौपट चाचण्या करण्याचं आव्हान आपल्यासमोर आहे, त्याचप्रमाणे लॉकडाऊनमुळे गरिबांसमोरील समस्या वाढल्या असून त्यांच्यासाठी सरकारला ६५ हजार कोटी रुपये खर्च करावे लागतील, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केले. कोरोनानंतर भारतीय अर्थव्यवस्थेवरील आव्हानाबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्याच्यासोबत संवाद साधला तेव्हा ते बोलत होते. 

poor
आशियाई विकास बँकेचे भारताला 1.5 अब्ज डॉलर्स
‘…तर लाखो भारतीय गरिबीच्या फेऱ्यात’

आपल्याकडे आयुष्य उत्तमपणे जगण्याची शैली आहे. आरोग्य, शिक्षणावर अनेक राज्यांनी चांगलं काम केलं आहे. मात्र मध्यम आणि कनिष्ठ मध्यम वर्गासमोरील आव्हानं मोठी आहेत. कोरोनाच्या संकटानंतर या वर्गाकडे चांगल्या नोकऱ्या नसतील. त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची नितांत आवश्यकता आहे. केवळ सरकारी नोकऱ्या पर्याय असू शकत नाही, अशा शब्दांमध्ये राजन यांनी कोरोनानंतरची आव्हान सांगितली. कोरोनानंतर अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर असणार आहे. त्यावर राजन यांनी भाष्य केलं. कोरोनानंतर भारत जागतिक पातळीवर एक मोठी भूमिका बजावू शकतो. कोरोनाचं संकट संपल्यानंतर जगात मोठे बदल होतील. त्यामध्ये भारत आपलं वेगळं स्थान निर्माण करू शकतो. त्यासाठी आपण आपले प्राधान्यक्रम निश्चित करायला हवेत. आरोग्याच्या, रोजगाराच्या संधी निर्माण करायला हव्यात, असं राजन यांनी सांगितलं.

अर्थ-उद्योग जगतातील ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here