ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्यांत ७२ टक्के वाढ

online education

मुंबई :
तंत्रज्ञानाच्या आधारे उच्च शिक्षण देणाऱ्या ‘अपग्रेड’ या भारतातील सर्वात मोठ्या ‘एडटेक’ कंपनीने आपले ४० (online education) अभ्यासक्रम आता दर तिमाहीएवजी दरमहा सुरू करण्याचे ठरविले आहे. विविध क्षेत्रांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून या अभ्यासक्रमांसाठी मागणी वाढल्याने ती पूर्ण करण्यासाठी कंपनीने प्रवेशाच्या तारखा बदलल्या आहे. यामुळे कंपनीच्या अभ्यासक्रमांची क्षमताही दुपटीपेक्षा अधिक वाढली आहे. प्रत्येक वर्गात शिकणाऱ्यांची संख्या आता एक हजार इतकी झाली आहे.

ऑनलाईन अभ्याक्रमांचा (online education) वर्ग जितका मोठा असेल तितका तो ‘पीअर-टू-पीअर’ पद्धतीने चालवणे अधिक श्रेयस्कर असते. ऑफलाइन पद्धतीपेक्षा हे अगदी उलट आहे,’’ असे ‘अपग्रेड’ चे सह-संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष रॉनी स्क्रूवाला यांनी सांगितले. “मागील महिन्यात आमच्या ऑनलाइन अभ्यासक्रमांसाठी पाच लाख जणांनी नोंदणी केली. हा आकडा गाठणे फार मोठी उपलब्धी आहे. १० कोटी इतक्या संख्येने कार्यरत असणाऱ्या व्यावसायिकांना व पदवीधरांना शिक्षण देण्याची आम्हाला संधी आहे आणि या आमच्या व्यवसायाची ही तर सुरुवात आहे,’’ असेही स्क्रूवाला म्हणाले.

online education
व्हॉट्सअपवर देखील दिसणार जाहिराती?

‘अपग्रेड’ चे वार्षिक उत्पन्न ५०० कोटी रुपये आहे. या तिमाहीत या दरापेक्षा अधिक उत्पन्न कंपनीला मिळेल, अशी अपेक्षा आहे. अनेक महाविद्यालयांना व विद्यापिठांना कंपनीतर्फे थेट शिक्षण मंच (लाइव्ह लर्निंग प्लॅटफॉर्म्स) विनामूल्य प्रदान करण्यात येणार आहे. त्यायोगे ‘कोविड-19’च्या साथीच्या काळात त्या संस्थांच्या विद्यार्थांना अखंडपणे शिक्षण घेता येईल. या कालावधीत कंपनीने सुरू केलेल्या ३५० तासांच्या विनामूल्य अभ्यासक्रमांसाठी १० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

अर्थ-उद्योग जगतातील ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here