ऑनलाईन शिक्षणावर विद्यार्थी खूश

मुंबई :
कोरोनामुळेच्या सद्य परिस्थितीचा विचार करता, ऑनलाइन शिक्षणामुळे शैक्षणिक संस्थांना मुलांसोबत व्यग्र राहण्यास आणि त्यांचे शिक्षण अखंड राखण्यास मदत झाल्याचे समोर आले आहे. ‘गोदरेज इंटिरिओ’ने शिक्षणाच्या जागेचा फेरविचार या विशेष श्वेतपत्रिकाद्वारे या लॉकडाऊनमधील विद्यार्थ्यांबद्दल केलेल्या सर्वेक्षणातून असे दिसून आले, की 78 टक्के मुले ऑनलाइन शिकण्याचा आनंद चांगला अनुभवतात. घरी राहून शिकता येत असल्याने ही मुले खूष असतात. 75 टक्के मुले ऑनलाइन वर्गातील शिक्षकांशी अधिक संवाद साधतात. ऑनलाइन शिकत असताना अभ्यासातील विविध संकल्पना चांगल्या प्रकारे समजून घेता येत असल्याचे 85 टक्के मुलांनी म्हटले आहे.
शिक्षण घेण्याच्या पद्धतींमध्ये यापुढील काळात कसे बदल होतील आणि शाळांवर त्याचा किती परिणाम होईल, हे लक्षात घेऊन, ‘गोदरेज इंटिरिओ’मधील ‘वर्कप्लेस अॅंड एर्गोनोमिक रिसर्च सेल’ने एक देशव्यापी सर्वेक्षण केले. सर्वेक्षणात भारतभरातील 3 ते 15 वर्ष वयोगटातील 350 पेक्षा जास्त शालेय मुलांच्या पालकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, शिक्षण घेण्याच्या जागेत भविष्यात कसे बदल करावे लागतील, याविषयी शिक्षक आणि मुख्याध्यापकांकडून मिळालेल्या प्रतिसादाचाही समावेश आहे.
घरी ऑनलाईन अभ्यास करताना मुलांचे लक्ष भावंडांमुळे किंवा कुटुंबातील इतर व्यक्तींमुळे विचलित होते, असे 50 टक्के पालकांचे निरीक्षण आहे. घरात सतत सुरू असलेल्या संभाषणांमुळे आणि इतर काही घडामोडींमुळे मुलांच्या अभ्यासावर परिणाम होतो. मुले अभ्यासापेक्षा या घडामोंडीमध्ये जास्त रस घेतात. तसेच, ऑनलाईन अभ्यास करताना तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी 62 टक्के मुलांनी केल्या आहेत. सुमारे 22 टक्के मुले ऑनलाईन अभ्यास करताना पलंगावर बसतात, तर 14 टक्के मुले जमिनीवर बसतात. ‘कोविड-19’च्या उद्रेकामुळे शैक्षणिक वर्ष विस्कळीत झाले, तसेच देशभरातील शाळांचे वर्ग व परिक्षा रद्द झाल्या. सामान्य रुपात सर्व काही परत चालू होण्यास वेळ लागणार आहे. मुलांनी शाळेत जाऊन वर्गात बसून शिकणे हेच खरोखरच गरजेचे आहे.
‘गोदरेज इंटिरिओ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल माथूर म्हणाले, “शिक्षण व्यवस्था ही हद्दींच्या पलिकडे जाऊन विविध माध्यमांतून विकसित होत असताना, शिक्षक आणि पालकांच्या जबाबदाऱ्या वाढत आहेत. शिकण्यात घालवलेले अनेक तास आणि शिकत असतानाची परिस्थिती, यांचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. शैक्षणिक वातावरणातील प्रत्येक बाबतीत विद्यार्थ्यांना प्रगती साधण्याचा ताण आणि इतर आव्हाने यांना तोंड द्यावे लागत असल्याने त्यांच्यात आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. शाळा पुन्हा सुरू करणे अपरिहार्यच आहे; त्या दृष्टीने मुलांचे तसेच शिक्षकांचे आरोग्य लक्षात घेत सर्व सावधगिरीचे उपाय योजून शैक्षणिक संस्थांची संरचना पुन्हा तयार करणे आवश्यक आहे. या धोरणानुसार, आम्ही शिकण्याच्या जागेची फेररचना करण्यासाठी एक मार्गदर्शक योजना विकसित केली आहे. शिकत असताना सर्वांनीच योग्य प्रकारचे संतुलन कसे राखावे, हे यात नमूद करण्यात आले आहे. नव्या सामान्य परिस्थितीत जगणे आणि ज्ञान मिळवण्यासाठी नाविन्यपूर्ण यंत्रणेचा उपयोग करणे या गोष्टी आपण स्वीकारलेल्या असताना, उत्पादनक्षम व निरोगी राहणेही महत्वाचे आहे.”


शिक्षण संस्था पुन्हा सुरू करताना सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी बहुआयामी स्वरुपाचे व टप्प्याटप्प्याने अमलात आणायचे नियोजन कसे असावे, याबद्दलच्या काही टिपा ‘गोदरेज इंटिरिओ’च्या श्वेतपत्रिकेत नमूद करण्यात आल्या आहेत…
निरनिराळ्या वेळी वर्ग भरवणे : शाळेमध्ये एकाच वेळी विद्यार्थ्यांची गर्दी होऊ नये, म्हणून आठवड्यामध्ये एक आड एक दिवस वर्ग भरवण्याचे वेळापत्रक तयार करावे लागेल. या वेळापत्रकानुसार, ज्या दिवशी विद्यार्थी शाळेत येणार नाही, त्या दिवशी तो व्हर्च्युअल पद्धतीने वर्गातील शिकवण्यात घरातून सहभागी होईल. सर्व विद्यार्थ्यांना एकाच वेळी येण्याची गरज नाही, हे सुनिश्चित करण्यासाठी दुहेरी पाळीत शाळा चालविण्याचाही मार्ग उपलब्ध आहे.
लहान आकाराचे वर्ग : मुलांमध्ये सुरक्षित अंतर राहावे, यासाठी वर्गातील मुलांची संख्या कमी करणे हा उपाय शाळा योजू शकेल. एका वर्गात 25 किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थी असतील, तर ते विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते.
वर्गातील रचनेमध्ये बदल : वर्गातील प्रत्येक डेस्कवर फक्त एक विद्यार्थी बसेल, असे नियोजन करून त्यांच्या बसण्याची व्यवस्था सुधारून घ्यावी लागेल. जेथे शक्य असेल तेथे 6 फुटांचे अंतर राखणे आवश्यक आहे. जागांचा वापर लवचिक स्वरुपात व बहुउद्देशी करण्यासाठी चाकांवरील सरकते फर्निचर घेणे व त्यांच्या वेगवेगळ्या रचना करून ते वापरणे याचा विचार शिक्षण संस्थाचालकांना करावा लागेल. सरकत्या, लवचिक फर्निचरमुळे वर्गातील डेस्क एकमेकांपासून पुरेसे दूर ठेवणे आणि त्यांची दिशा हवी तशी वळवणे हे साध्य होऊन वर्गाचा लेआऊट सुधारता येईल.
जागांचा फेरवापर : सुरक्षित अंतर ठेवण्याच्या नियोजनात कमी वापरात असणाऱ्या जागांचा उपयोग शिकविण्यासाठी करता येणे शक्य आहे. या जागा विलगीकरण कक्षामध्येही रुपांतरीत करता येतील. ग्रंथालय, क्रीडा वर्ग, संगणक कक्ष आणि समुदाय कक्ष यांचेही रुपांतर वर्गखोल्यांमध्ये करून सुरक्षित अंतर ठेवण्याला महत्त्व देता येईल.
डेस्क बंदिस्त करणे व खुर्च्यांवर आवरणे घालणे : संगणक कक्ष व लायब्ररी यांसारख्या सामाईक क्षेत्रांमधील बाके, टेबले व खुर्च्या यांचा इतरांकडून वापर टाळता यावा, याकरीता ती बंदिस्त करणे सोयीस्कर ठरेल. ही आवरणे दररोज सहजपणे स्वच्छ व निर्जंतूक करता यायला हवीत.
कॅफेटेरिया आणि कॅन्टीनमध्ये बसण्याची व्यवस्था : कॅफे आणि कॅन्टीन येथील आसनव्यवस्था महत्त्वपूर्ण आहे, कारण खाताना-पिताना फेसमास्क घालणे शक्य नसते. म्हणूनच, या ठिकाणी आसनव्यवस्था करताना सामाजिक अंतर राखता येईल, अशी तजवीज करण्याची शिफारस करण्यात येत आहे. खाद्यपदार्थांचे सेवन करताना कोणाला शिंका किंवा खोकला आल्यास, इतरांना सुरक्षा मिळावी म्हणून टेबलांच्या दोन रांगांमध्ये गार्ड किंवा पडदे लावावेत. जेवताना लोकांना एकमेकांना पाहता यावे, म्हणून हे गार्ड अ‍ॅक्रेलिकसारख्या पारदर्शक सामग्रीचे बनवावेत. या पडद्यांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण सुलभ पद्धतीने करता आली पाहिजे, याची दक्षता घ्यावी.
‘स्टाफ रूम’ आणि ‘अॅडमिन रूम’मधील विभागणी : ‘स्टाफ रूम’मध्ये दोन शिक्षकांच्या बसण्याच्या जागांमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या पार्टिशनची उंची वाढवून त्यांच्या एकमेकांच्या सुरक्षिततेची काळजी घेता येईल. शेजारी-शेजारी बसणाऱ्या शिक्षकांना सुरक्षितता लाभावी, म्हणून जमिनीवर 6 फूट उंचीचे स्क्रीनही उभारता येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here