मुंबई :
‘गुडनाइट’च्या गोल्ड फ्लॅश कॉम्बो (मशिन + रिफिल) पॅक खरेदी करून सोन्याची नाणी जिंकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. 89 रुपये किंमत असलेले गुडनाइट गोल्ड फ्लॅश भारतातील सर्वात सामर्थ्यवान लिक्विड व्हेपरायझर असून त्याच्या फ्लॅश व्हेपर्स दृश्यमान आहेत. हे उत्पादन गुडनाइटची कुटुंबांना कीटकांपासून होणाऱ्या आजारांविरोधात संरक्षण पुरवण्याची बांधिलकी आणखी मजबूत करणारे असून याद्वारे त्यांना येत्या सणासुदीच्या काळात बक्षिसेही जिंकता येतील. या ग्राहकोपयोगी उपक्रमाचा एक भाग म्हणून गुडनाइटने 100 सोन्याची नाणी देण्याचे ठरवले आहे. या आठवड्यापासून 10 भाग्यवान विजेत्यांना दर आठवड्याला एक ग्रॅमचे सोन्याचे नाणे जिंकण्याची संधी मिळणार आहे. त्याशिवाय अंतिम फेरीत 50 विजेते निवडले जातील व त्याची घोषणा दिवाळीपूर्वी होईल. या उपक्रमाद्वारे गुडनाइटने देशभरातील ग्राहकांना आनंद देण्याचे उद्देश ठेवले आहे. त्याशिवाय ब्रँडला गुडनाइट गोल्ड फ्लॅश या आपल्या अत्याधुनिक आणि अद्यावत उत्पादनाविषयी जागरूकता करायची आहे.
अॅमेझॉनवर ‘टीसीएल टीव्ही डेज’चे आयोजन
या उपक्रमाविषयी गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे (जीसीपीएल) भारत व सार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कटारिया म्हणाले, ‘गुडनाइट घरगुती कीटकनाशक उत्पादन बाजारपेठेतील आघाडीचा ब्रँड आहे. कीटकांमुळे होणाऱ्या आजारांपासून चौफेर संरक्षण हवे असणाऱ्या कुटुंबासाठी आमचा ब्रँड सर्वाधिक पसंतीचा आणि विश्वासार्ह आहे. ‘गोल्ड फॉर गोल्ड’ या पक्रमाद्वारे आही आमच्या ग्राहकांना समाधान देण्याचे ठरवले असून गुडनाइट गोल्ड फ्लॅशच्या वापराला चालना देण्याचेही उद्दिष्ट आहे.’ अत्याधुनिक हीटिंग तंत्रज्ञान आणि दृश्य कार्यक्षमता यांमुळे गुडनाइट गोल्ड फ्लॅश भारतातील लिक्विड व्हेपोरायझर क्षेत्रातील समीकरणे बदलण्यासाठी सज्ज झाले आहे. हे उत्पादन नॉर्मल आणि फ्लॅश मोडमध्ये देण्यात आले असून त्याला अनोख्या चिप- आधारित तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे, जे या दोन्ही मोड्समध्ये सहजपणे बदल करणे शक्य होते. हे उत्पादन पहिली 30 मिनिटे फ्लॅश व्हेपर्स सोडते व नंतर आपोआप नॉर्मल मोडवर जाते. फ्लॅश व्हेपर्स आणि सुधारित मशिनमुळे कोपऱ्यांत लपलेले डासही नष्ट केले जातात. गोल् फॉर गोल्ड हा उपक्रम संपूर्ण भारतात सप्टेंबर ते मध्य- ऑक्टोबरपर्यंत गुडनाइट गोल्ड फ्लॅशच्या खरेदीवर लागू आहे.