गरजेनुसार ‘ऑन-ऑफ’ करता येणारा विमा

मुंबई :
एडलवाइस जनरल इन्शुरन्सने  एडलवाइस स्विच नावाच्या नाविन्यपूर्ण, अ‍ॅप-आधारित मोटर ओडी फ्लोटर पॉलिसी आणली आहे. यामध्ये चालक-आधारित मोटर विमा पॉलिसी, वाहन मालकांना वापराच्या आधारे मोटार विमा चालू आणि बंद स्विच करण्याची मुभा आहे आणि या एकाच पॉलिसीअंतर्गत एका पेक्षा अधिक वाहने कव्हर केली जातात. 
इतर मोटर ओडी पॉलिसींच्या तुलनेत एडलवाइस स्विचमध्ये जाणवलेला मोठा फरक म्हणजे हा चालक-आधारित विमा आहे, जेथे ड्रायव्हरच्या वय आणि अनुभवावर प्रीमियम ठरवला जातो. एडलवाइस स्विच तुम्ही जेवढे वापराल तसे पैसे भरा या मॉडेलवर आधारित ग्राहकांना वाहन वापरल्याच्या दिवशीचेच प्रीमियम भरण्याची आवश्यकता असते ज्यामुळे ग्राहकाची खूप बचत आणि सुविधा होते. ज्यादिवशी ते वाहन चालवतात त्यावर अवलंबून ग्राहक त्यांचे पॉलिसी कव्हर ‘ऑन’ किंवा ‘ऑफ’ स्विच करण्यासाठी अ‍ॅप वापरू शकतात. तसेच, जेव्हा ही पॉलिसी चालू असते तेव्हा अपघाती नुकसान कव्हर होते, त्या वेळी वाहने आग व चोरीच्या पासून 24X7X365 संरक्षित केली जातील, जरी त्यावेळेस पॉलिसी बंद केलेली असेल तरीही कारण वाहन चालवीत नसतांना देखील या घटना घडू शकतात.
‘या’ विमा योजनेतील २७६ कोटीचे दावे मान्य

एडलवाइस जनरल इन्शुरन्सच्या ईडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शनाई घोष म्हणाल्या, ‘एडलवाइस स्विच आजच्या ग्राहकांच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन बनवले गेले आहे, जिथे आपण आपले वाहन नियमितपणे वापरू शकत नाही किंवा आपली कार आणि दुचाकी दरम्यान पर्याय निवडू शकता. या  चालक-आधारित विमा अंतर्गत पॉलिसीधारकांला कमी प्रीमियम भरावे लागेल, कारण ते फक्त वापरानुसार देय असतील. या व्यतिरिक्त, एका पॉलिसीच्या अंतर्गत अनेक वाहने कव्हर करण्यात आल्यामुळे विशेषत: ज्या ग्राहकांकडे एकाधिक वाहने आहेत त्यांच्या बचतीमध्ये भर पडेल.’ 
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here