‘आकाश’ ठरली सर्वोत्तम शिक्षणसंस्था

aakash

मुंबई :
देशातील सर्वोत्तम 30 शैक्षणिक संस्थेच्या यादीत सर्वोच्च शैक्षणिक मार्गदर्शन (कोचिंग) उपलब्ध करून देणारी संस्था म्हणून आकाश इन्स्टिट्यूडने नाव पटकावले. भारतातील नियतकालिकांच्या दुनियेत सर्वाधिक खप असलेल्या इंडिया टुडे’कडून त्यांच्या वार्षिक सर्वोत्तम शैक्षणिक मार्गदर्शनपर संस्था क्रमवारीत हा मान आकाशला प्राप्त झाला. NEET करिता सर्वोच्च शैक्षणिक संस्था म्हणून पहिल्या क्रमांकावर नाव उमटविण्याचे आकाश इन्स्टीट्युटचे हे सलग दुसरे वर्ष आहे.
आकाश’चा JEE विभाग असलेल्या Aakash IITJEE ने देखील भारतात 5 व्या क्रमांकावर बाजी मारली आहे. देशभर अभियांत्रिकी परीक्षा तयारीसाठी असणाऱ्या कोचिंग सेंटरमध्ये हे सर्व्हेक्षण घेण्यात आले. अल्प कालावधीत एखाद्या संस्थेने बजावलेली ही कामगिरी नक्कीच अतुलनीय आहे. जेईईकरिता शैक्षणिक मार्गदर्शन उपलब्ध करून देणाऱ्या सर्वोच्च 5 संस्थांमध्ये आकाशचे नाव येते. या संस्थेच्या वतीने गुणवत्तापूर्ण अभ्यास साहित्य, उच्च प्रशिक्षित शिक्षक वर्ग आणि चांगल्याप्रकारे संशोधित परीक्षा प्रश्नसंच उपलब्ध करून दिले जातात. क्रमवारीसाठी, मार्केटींग अँड डेव्हलपमेंट रिसर्च असोसिएट (एमडीआरआर) या विख्यात मार्केट रिसर्च एजन्सीने – विद्यार्थी गुणवत्ता आणि शुल्क; शिक्षकांची गुणवत्ता; शैक्षणिक स्त्रोत; प्रशिक्षण प्रक्रिया आणि परिणाम अशा पाच बृहद निकषांवर संस्थांचे मूल्यमापन केले.
आकाश इन्स्टीट्युटने यापूर्वी दिलेल्या निकालांचे प्रमाण, अनुभवी शिक्षक वर्गाची तज्ज्ञता, आधुनिक परीक्षा नमुने, संगणक-आधारीत परीक्षा सुविधा, सक्षम तसेच व्यापक अभ्यास साहित्य, शंका निरसनासाठी व्यक्तिगत साह्य, विद्यार्थी घडवणे आणि वैयक्तिकरित्या लक्ष, प्रोत्साहनपर साह्य तसेच विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन, विद्यार्थी हजेरीवर नियमित देखरेख, विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर प्रतिसाद, नियमित पालक-शिक्षक भेटी आणि विद्यार्थ्यांच्या अंगीभूत गुणांचे सखोल विश्लेषण यामुळे NEET करिता आकाश ही शैक्षणिक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यारी पहिल्या क्रमांकाची संस्था ठरली.
‘या’ शहरातील लोक राखतात काम आणि आयुष्याचा समतोल
aakash
क्रमवारीबद्दल बोलताना आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड (एईएसएल)चे संचालक आणि सीईओ आकाश चौधरी म्हणाले की, “देशाचे सर्वात नामांकीत नियतकालिक, इंडिया टुडे’कडून आम्हाला NEET करिता भारताची पहिल्या क्रमांकाची कोचिंग इन्स्टीट्युट आणि JEE साठी 5 व्या स्थान प्राप्त झाले याचे समाधान वाटते. आमचे संस्थापक आणि सीएमडी, जे. सी चौधरी तसेच तज्ज्ञ शिक्षक वर्गाच्या मार्गदर्शनाखाली आमच्या विद्यार्थ्यांनी अतुलनीय विश्वास जपून सातत्यपूर्ण कामगिरी बजावली आणि मागील 32 वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी बजावली आहे. आमचे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या दोघांच्या कठोर मेहनतीचे हे फलित आहे. आगामी काळात आम्ही आणखी चांगल्याप्रकारे वचनबद्धता जपून जास्त जबाबदारीने सेवा उपलब्ध करून देऊ.” 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here