मुंबई :
सध्या महासाथीच्या स्थितीत शिक्षण क्षेत्रात बदल घडत असून वर्गातील शिक्षणाचे परिवर्तन ऑनलाईन शिक्षणात झाले. आकाश (aakash) एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेडच्यावतीने त्यांची व्यावसायिक प्रक्रिया प्रमाणित करून परिवर्तनाच्या दिशेने पाऊल उचलण्यात आले आहे. त्यामुळे प्रभावी कामकाजाचा अवलंब करून अंतर्गत त्याचप्रमाणे बाह्य घटकांना गुणवत्तापूर्ण डिजीटल शिक्षण सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी एसएपी’ज नेक्स्ट-जनरेशन डिजीटल कोअर, SAP S/4HANA या चतुर, एकात्मिक ईआरपी यंत्रणेची निवड करून बुद्धिमान ऑटोमेशन समवेत क्रांतिकारी व्यावसायिक प्रक्रियेला साह्य केले. हे डिजीटल अद्ययावतीकरण करण्यात आल्याने एईएसईएल वित्तीय परिवर्तनाच्या दिशेने आपला पाया रोवणार आहे. ज्यावर कंपनी अंदाज निश्चित करेल, वाढेल आणि आगामी भविष्यासाठी सुसज्ज होईल.
याविषयी बोलताना आकाश (aakash) एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेडचे संचालक आणि सीईओ आकाश चौधरी म्हणाले की: “आम्ही आमचे संपूर्ण बिझनेस मॉडेल आणि यंत्रणा डिजीटाईज करण्याकरिता मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानावर गुंतवणूक करतो आहे. जेणेकरून आम्ही काळासोबत चालत राहू, आमच्या आगामी काळातील ग्राहकांना ऑफर देण्यात सुधारणा करू. टेक्नोलॉजी आर्किटेक्ट SAP S/4 HANA वर आमचा विश्वास आहे. कंपनीच्या आगामी योजनांना आकार देण्यासाठी आमच्या प्रक्रिया आणि सेवा सुलभरितीने पूर्णत्वास नेण्यात येणार आहे.”
‘त्यांना’ मिळणार ई शिक्षणाची ‘नवी दिशा’
“भारताकडे 5-24 वयोगटातील सुमारे 500 दशलक्ष विद्यार्थी वर्ग असून जगातील सर्वाधिक मोठी लोकसंख्या ही विद्यार्थीदशेत मोडते. शिक्षण क्षेत्रासाठी ही मोठी संधी आहे. शिक्षण यंत्रणेत आगामी विकास शक्य होण्याच्या दिशेने परिवर्तनशील तसेच कल्पक पद्धतींचा अवलंब करण्याची मोठी आवश्यकता आहे,”असे नॉर्थ अँड इस्ट इंडिया, बांगलादेश, एसएपी, व्हाईस प्रेसिडेंट सेल्स, पर्वेश घई म्हणाले. (aakash) विश्वास ‘डिजीटल ट्रान्सफॉर्मेशन्स’वर असून आम्ही अशा संस्थाना पाठबळ देतो. जेणेकरून शिक्षण आणि शिक्षणविषयक अनुभव पुढल्या स्तरावर घेऊन जाण्यात मोठ्या संधी उपलब्ध होतात.”
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक करा…