‘जेईई’, ‘एनईईटी’साठी ऑनलाईन उपक्रम

मुंबई :
आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेडच्यावतीने ‘आकाश प्राईमक्लास’ या एकमेव अशा विस्तारीत वर्ग अभ्यासक्रमाद्वारे इयत्ता VIII ते इयत्ता XII आणि XII उत्तीर्णांकरिता दीर्घकालीन अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली.  पद्धतीत न्यू एज सॅटेलाईट टेक्नोलॉजीचा अवलंब करण्यात आला आहे. इयत्ता VIII ते इयत्ता X च्या विद्यार्थ्यांसाठी एक ते दोन वर्षांचे फाउंडेशन कोर्स उपलब्ध करून देण्यात आले असून डॉक्टर आणि आयआयटीयन होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या इयत्ता XI आणि XII आणि XII उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एक ते दोन वर्षांचे अभ्यासक्रम आयोजित करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांना www.primeclass.aakash.ac.in वर लॉग इन करता येईल. जेईई तसेच एनईईटी इच्छुकांसाठी असलेल्या अभ्यासक्रमांची विशिष्ट माहिती https://www.aakash.ac.in/prime-course-jee/आणि https://www.aakash.ac.in/prime-course-neet/ वर पाहता येईल.
सध्याच्या अनिश्चित काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला महत्त्व देत युट्युबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या घरत लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात येणार आहे. आकाश प्राईमक्लास हे टू-वे इंटरअॅक्टीव्ह माध्यम असून याद्वारे अभ्यासवर्गाच्या वातावरणात ऑलिम्पियाड, जेईई आणि एनईईटीच्या परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना करता येईल. या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वत:च्या नगरात/शहरात बसून वर्गातील अभ्यासाचा अनुभव, दिल्ली लाईव्ह आधारीत फॅकल्टी@Aakash सोबत ऑन स्क्रीन इंटरअॅक्टींगची सोय देण्यात आली आहे.

व्हर्चुअल शिक्षणाकरिता होतोय ‘या’ प्लॅटफॉर्म वापर

जे विद्यार्थी ‘बोर्ड’ आणि स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी या अभ्यास कार्यक्रमामार्फत अद्वितीय एकीकृत शिक्षण अनुभव उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हे अभ्यासवर्ग अभिनव पद्धतीच्या एव्ही सेटअपवर चालत असून त्यामध्ये हाय-डेफिनेशन प्रोजेक्शन सिस्टीम आणि हाय-रेझोल्युशन क्लासरूम कॅमेऱ्याची सुविधा करण्यात आली आहे.
या अभ्यासक्रमाबद्दल एईएसएलचे डायरेक्टर आणि सीईओ आकाश चौधरी यांनी सांगितले कि, या आव्हानात्मक काळात जेईई आणि एनईईटी त्याचप्रमाणे ऑलिम्पियाड परीक्षार्थीना संपूर्ण सहकार्याची आम्ही खातरजमा करू. मग त्यांचे भौगोलिक ठिकाण कोणतेही असो. आकाश प्राईमक्लास येथे अविरत चाचण्या आणि विश्लेषणासमवेत कल्पक शिक्षण अनुभवाची सोय विद्यार्थ्यांसाठी करण्यात आली आहे. ज्यामुळे त्यांना त्यांच्या शैक्षणिक कामगिरीत मदत मिळेल, सोबतच उत्तम दूरदृष्टी आणि संधी लाभेल. आमची अभ्यास सत्रे मनोरंजक, संभाषणपर असून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करणारी आहेत. विद्यार्थी या ठिकाणी आपल्या अडचणी आणि समस्या शिक्षकांपुढे मांडू शकतील. विद्यार्थी तसेच शिक्षक वर्ग या अभिनव उपक्रमाचा फायदा घेतील ही आशा आम्हाला वाटते.”
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here