आत्मनिर्भर भारत : ‘१८५०० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात’

नवी दिल्ली :
‘आत्मनिर्भर भारत’ पॅकेजच्या आजच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अन्न प्रक्रिया उद्योग आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला. पीएम किसान योजनेतून १८५०० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात आले आहेत. या काळात दुधाची विक्री कमी झाली. या योजनेतून ५००० कोटी रुपये दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. याचा एकूण २००० कोटी शेतकऱ्यांना फायदा झाला, असे सीतारामन यांनी सांगितले. मच्छीमारांसाठी तीन महिन्यांचा दिलासा देण्यात आला आहे. त्यांना मत्स्यपालनासाठी मदत देण्यात आली आहे.  १ लाख कोटी अॅग्रीगेटर, आयपीओ, कृषी संस्था, कृषी उद्योजक यांना शेतीची अद्ययावत उपकरणे, कोल्ड स्टोरेज, धान्यसाठा कोठारे बनविण्यासाठी देण्यात येणार आहेत. याद्वारे परदेशात शेतमाल पाठविण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे, असे सीतारामन यांनी सांगितले.
तसेच अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी १० हजार कोटी रुपये देण्यात येणार आहेत. मत्स्य उद्योगासाठी २० हजार कोटींची मदत देण्यात येणार असून पुढील ५ वर्षांत ७० लाख टन उत्पादन घेण्यात येईल. याद्वारे ५५ लाख नवीन रोजगार उपलब्ध होतील, असे सीतारामन यांनी सांगितले.  देशातील विविध भागांत तिथल्या तिथल्या प्रसिद्ध पदार्थांचे क्लस्टर उभे करता येऊ शकतात. उदाहरणार्थ काश्मीरमध्ये केशर, तेलंगणामध्ये हळद, कर्नाटकात रागी, ईशान्य भारतात बांबू शूट आणि फळ प्रक्रिया क्लस्टर उभे केले जाऊ शकतात, असे त्या म्हणाल्या.
स्थलांतरित मजूराना दोन महिने मोफत धान्य

लाळ्या खुरकत रोगापासून पशुधन वाचविण्यासाठी 13 हजार 343 कोटी रुपये देण्यात आले आहेत. याद्वारे ५३ कोटी पशुधनाचे लसीकरण करण्यात येणार आहे. पशुपालन क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी १५ हजार कोटी रुपये देण्यात येणार आहेत. याद्वारे दुग्धउत्पादन, स्टोरेज, डेअरी प्रक्रिया उद्योग, पशु खाद्य निर्मितीसाठी मदत मिळणार आहे. याद्वारे निर्यात करणाऱ्या कंपन्यांना इन्सेंटिव्हही दिला जाईल.
औषधी वनस्पतींसाठी चार हजार कोटीची मदत देण्यात येणार आहे. या औषधांना जगभरात मोठी मागणी आहे. याद्वारे पाच हजार शेतकऱ्यांना फायदा होणार असून गंगेच्या किनाऱ्यावर ८०० हेक्टरवर याची लागवड केली जाणार आहे. पुढील दोन वर्षांत १० लाख हेक्टरवर लागवड वाढविण्यात येईल, असे  सीतारामन यांनी सांगितले.
लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांना भाजीपाला विकण्यात अडचणी आल्या होत्या. यामुळे सरकारने ऑपरेशन ग्रीन योजना तयार केली असून टॉमेटो, कांदा, बटाटे यासारख्या भाज्यांसाठी ५० टक्के अनुदान देण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here