एअरबीएनबीचे गोव्यात ६१ दशलक्ष डॉलर्सचे पर्यटन

पणजी :
एअरबीएनबी समुदायाने २०१९ या वर्षांत गोव्यातील अर्थव्यवस्थेत ६१ दशलक्ष अमिरेकन डॉलरचे (४ अब्ज रुपये) योगदान दिले असून साडे सात हजारांहून अधिक रोजगारांना पाठबळ दिले. आज प्रकाशित करण्यात आलेल्या ऑक्स्फर्ड इकॉनॉमिक्सच्या द इकॉनॉमिक इम्पॅक्ट ऑफ एअरबीएनबी इन इंडिया या अहवालात ही माहिती नमूद करण्यात आली आहे.
या महत्त्वपूर्ण अहवालात एअरबीएनबीच्या भारतातील २०१५ ते २०१९ या कालावधीतील परिणामाचे विश्लेषण करण्यात आले असून गोव्याच्या पर्यटनाधारित अर्थव्यवस्थेत एअरबीएनबीने लक्षणीय योगदान दिल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या पाच वर्षांत एअरबीएनबीच्या माध्यमातून आलेल्या पाहुण्यांनी गोव्यात एकूण १५५.८ दशलक्ष अमेरिकन डॉलर (११ अब्ज रुपये) खर्च केले असून त्यापैकी ६४.२ दशलक्ष अमेरिकन डॉलर तर केवळ २०१९ या एका वर्षात खर्च केले आहेत.
महत्त्वाचे म्हणजे, एअरबीएनबीच्या समुदायकेंद्री दृष्टिकोनामुळे सूक्ष्म उद्योजक आणि छोट्या व्यवसायांपर्यंत पर्यटनाचा लाभ कशा प्रकारे पोहोचत आहे, हेही या अहवालातून अधोरेखित झाले आहे. एअरबीएनबीच्या भारतातील पाहुण्यांनी राहाण्यासाठीच्या व्यवस्थेव्यतिरिक्त खर्च केलेल्या प्रत्येक १० हजार रुपयांपैकी साडे सहा हजार रुपये खरेदी किंवा खाण्यावर खर्च केले असून त्यामुळे स्थानिक व्यवसायांना पाठबळ लाभले आहे.
ऑक्स्फर्ड इकॉनॉमिक्सचे आशियातील आर्थिक सल्ला सेवा विषयक संचालक जेम्स लँबर्ट म्हणाले : “पर्यटानाधारित अर्थव्यवस्थेत पर्यटकांना पुन्हा खेचून आणणे आणि त्यांच्या खर्चाला पुन्हा चालना देण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय प्रवासाऐवजी आपल्या देशातच एखादा नवा प्रदेश पाहाण्याची इच्छा असलेल्यांना मदत करून देशांतर्गत प्रवासाचे पुनरुज्जीवन करण्यास मदत करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावण्याची क्षमता एअरबीएनबीकडे आहे.”

एअरबीएनबीचे भारत, आग्नेय आशिया, हाँगकाँग आणि तैवान प्रदेशाचे महाव्यवस्थापक अमनप्रीत बजाज म्हणाले, “गोवा भारतातील सर्वाधिक पसंतीचे आणि मागणी असलेले पर्यटनस्थळ आहे. पर्यटन उद्योग हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून राज्यातील स्थानिकांसाठी सूक्ष्म उद्योजकतेच्या संधी पर्यटनाद्वारे निर्माण होतात. तसेच, पर्यटनाशी संबंधित उद्योगांमध्ये हजारो स्थानिकांना रोजगार मिळतो. सध्या सुरू असलेल्या साथीच्या आजाराचे वर्तुळ आपण पूर्ण करत असताना स्थानिक समुदायांवर या साथीचा झालेल्या परिणामांवर तोडगा काढण्यास सुरुवात करणेही महत्त्वाचे आहे. येणाऱ्या काळात गोव्यात उच्च दर्जाच्या आणि शाश्वत पर्यटनाला पाठबळ देण्यासाठी गोवा सरकारशी अधिक निकटपणे काम करण्याची आमची इच्छा आहे.”
एअरबीएनबीने २०१९ या वर्षात भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात ३२० अमेरिकन डॉलरचे (२३ अब्ज रुपये) योगदान दिले असून देशातील ५० हजारांहून अधिक स्थानिक रोजगारांना पाठबळ दिल्याचेही अहवालातून अधोरेखित झाले आहे. २०१५ ते २०१९ या काळात एअरबीएनबीच्या पाहुण्यांनी भारतात एकूण ६१० दशलक्ष अमेरिकन डॉलर (४५ अब्ज रुपये) खर्च केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here