मुंबई :
कोविड-१९ प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे प्रभावित लोकांना साह्य करण्यासाठी सरकारच्या बचावकार्यांमध्ये मदतीचा हात देत अक्षय पात्र (akshay patra) फाऊंडेशनने स्थलांतरित लोक, रोजंदारी कामगार, औद्योगिक कामगार, बेघर लोक अशा वंचित समुदायांना २ कोटीहून अधिक भोजन व्यवस्था दिली आहे. फाऊंडेशन भारत सरकार, विविध राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश प्रशासन व नागरी संस्थांसोबत सहयोगाने काम करण्यासोबत या लोकांना दररोज ताजे शिजवलेले अन्न व फूड रिलीफ किट्सची सेवा देण्यासाठी काम करत आहे.
आंध्रप्रदेश, आसाम, छत्तीसगड, दादरा व नगर हवेली, दिल्ली व एनसीआर, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तरप्रदेश व उत्तराखंडमध्ये रिलीफ फिडिंग उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
अक्षय पात्र (akshay patra) त्यांच्या किचन नेटवर्कचा उपयोग करत भोजन तयार करत आहे आणि ते अधिका-यांनी सांगितलेल्या केंद्रांकडे नेले जात आहेत. त्यानंतर हे भोजन गरजू लोकांना देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे देशभरातील विविध ठिकाणी पॅकेजिंग केंद्रे स्थापित करण्यात आली आहेत. या केंद्रांमध्ये स्थानिक चवीनुसार आवश्यक किराणा वस्तू असलेले फूड रिलीफ किट्स पॅक केले जात आहेत. उदारणार्थ, बेंगळुरूमध्ये वाटप करण्यात येणा-या किट्समध्ये तांदूळ, तूरडाळ, तेल, मसाले, सांबार व रसम पावडर आणि बटाटे व भोपळा सारख्या दीर्घकाळापर्यंत टिकणा-या भाज्या आहेत. प्रत्येक किटमध्ये ४२ किंवा २८ भोजन तयार करण्यासाठी पुरेशा प्रमाणात किराणा माल आहे.
मुंबई-पुण्यात लॉकडाउन १८ मे पर्यंत?
akshay patra फाऊंडेशनला मूर्ती दाम्पत्यांचे १० कोटी :
या प्रयत्नामध्ये (akshay patra) फाऊंडेशनला सक्रिय कॉर्पोरेट भागीदार आणि वैयक्तिक दात्यांचे साह्य लाभले आहे. सुधा मूर्ती व नारायण मूर्ती आणि त्यांच्या कुटुंबाने अक्षय पात्रच्या कोविड-१९ बचावकार्यामध्ये त्यांच्या वैयक्तिक निधींमधून १० कोटी रूपयांचे योगदान दिले. या मोठ्या प्रमाणातील दानामुळे अक्षय पात्रला १.३३ लाख फूड रिलीफ किट्सचे वाटप करण्यास शक्य झाले आहे, हे किट्स ५५,८६,००० भोजनांएवढे आहेत.
बायोकॉन फाऊंडेशन, कॅपजेमिनी, सिस्को, कोका-कोला, सीएलपी, डॉएच बँक, डीएलएफ फाऊंडेशन, गोल्डमन सॅच्स, ग्लॅण्ड फार्मास्युटिकल्स, एचटी पारेख फाऊंडेशन, हिरो मोटोकॉर्प, इन्फोसिस फाऊंडेशन, एलजी इलेक्ट्रॉनिक्स, मॉर्गन स्टॅण्ली, नेस्ले इंडिया, पेप्सीको फाऊंडेशन, सरोजिनी ट्रस्ट, टेक्सास इन्स्ट्रूमेण्ट्स, वेदांता, विवो, वॉलमार्ट अशा इतर अनेक कॉर्पारेट कंपन्यांनी पुढाकार घेऊन रिलीफ फिडिंग उपक्रमामध्ये योगदान दिले आहे.
तसेच ऋतिक रोशन व रविना टंडन यांसारख्या प्रतिष्ठित बॉलिवुड व्यक्तींनी देखील फाऊंडेशनच्या प्रयत्नांमध्ये दान केले आहे.
या प्रयत्नांबाबत बोलताना अक्षय पात्र (akshay patra) फाऊंडेशनचे अध्यक्ष मधु पंडित दासा म्हणाले, ”आम्ही प्रत्येकाच्या सहयोगात्मक साह्याच्या माध्यमातून या कठीण काळामध्ये गरजू लोकांना २ कोटीहून अधिक भोजन व्यवस्था देऊ शकलो आहोत. मी आशा करतो की, स्थिती लवरकच सुधारेल आणि लोकांचे दैनंदिन जीवन पुन्हा एकदा सुरळीत होईल. तोपर्यंत आम्ही अधिकाधिक लोकांना सेवा देण्याचे आमचे प्रयत्न सुरूच ठेवू.”
अर्थ-उद्योग जगतातील ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज.