‘सगळ्याच वस्तूंच्या online विक्रीची परवानगी द्या’

online

नवी दिल्ली :
जीवनावश्यक वस्तूंसह इतर सर्व वस्तूंची ऑनलाईन (online) विक्री आणि घरपोच सेवा सुरू करण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही ई-कॉमर्स कंपन्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. जीवनावश्यक वस्तूंसह इतरही वस्तूंची ग्राहकांना आता गरज आहे. त्यामुळे त्या घरपोच पुरविण्यास मंजुरी द्यावी. आम्ही शारीरिक अंतर आणि आरोग्यविषयक सुरक्षेसह या वस्तू ग्राहकांना पुरवू, असे आश्वासन या दोन्ही कंपन्यांकडून देण्यात आले आहे.

online
…म्हणून अमेझॉन पोहचले स्थानिक दुकानापर्यंत 

देशात २५ मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तेव्हापासून जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व वस्तूंच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. ई-कॉमर्स कंपन्यांनाही केवळ जीवनावश्यक वस्तूंची ऑनलाईन (online) विक्री करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पण आता या कंपन्यांनी सर्वच वस्तूंची ऑनलाईन (online) विक्री आणि घरपोच सेवा पुरविण्यास परवानगी मागितली आहे. ऍमेझॉन इंडियाने  एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, शारीरिक अंतर राखून ग्राहकांची गरज भागविण्याचे आणि विक्रेत्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम ऍमेझॉनकडून केले जाते. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. त्यासाठीच आम्हाला परवानगी दिली गेली पाहिजे. ऑनलाईन (online) पद्धतीने विस्तूंची विक्री करण्यास परवानगी दिल्यास अनेक छोट्या उद्योजकांना त्याचा आधार मिळणार आहे, असेही ऍमेझॉन इंडियाने म्हटले आहे.

अर्थ-उद्योग जगतातील ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here