…म्हणून अमेझॉन पोहचले स्थानिक दुकानापर्यंत 

amazon

​नवी दिल्ली :
​फेसबुक आणि जिओ यांच्या डीलनंतर भारतीय ई-कॉमर्स क्षेत्र सावध झाले आहे. त्यामुळे आघाडीची ई-कॉमर्स कंपनी अमेझॉन (amazon) इंडियाने ऑफलाइन धोरण स्वीकारलं आहे. अमेझॉनही विविध किराणा दुकानांना जोडून ऑफलाइन धोरण स्वीकारणार आहे. प्रशिक्षणासाठी गुंतवणूक करण्याचा निर्णयही अमेझॉन (amazon) इंडियाने जाहीर केला आहे. फेसबुक-जिओ डीलने अमेझॉन सावध फेसबुकने भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्यानंतर अमेझॉननेही खबरदारी घेतली आहे. ‘लोकल शॉप्स ऑन अमेझॉन’ यात वाढ करत असल्याचं अमेझॉनने आपल्या निवेदनात म्हटले आहे. 
amazon
काय करणार जिओ, फेसबुकच्या गुंतवणूकीचे?

अमेझॉनच्या माध्यमातून आणखी व्यवसाय वाढवता यावा यासाठी अमेझॉनने लोकल शॉप्ससाठी पुढाकार घेतला होता. पण आता स्पर्धक कंपनी यात पूर्ण ताकदीने उतरताना दिसल्यानंतर अमेझॉनने यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊननंतर या व्यापारात मोठ्या प्रमाणात वाढ होणं अमेझॉनला अपेक्षित आहे.

​पाच हजार दुकानां​ची amazon ​​नोंदणी :

अमेझॉन आणखी गुंतवणूक करणार लॉकडाऊननंतरही ऑफलाइन दुकानांचा व्यवसाय धीम्या गतीने राहणार आहे. त्यामुळे अमेझॉन या व्यवसायाला बळ देण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावण्यासाठी सज्ज आहे. अमेझॉन आता साइन-अप, प्रशिक्षण आणि यादी तयार करण्यासाठी आणखी १० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे, अशी घोषणा अमेझॉन इंडिया मार्केटप्लेसचे उपाध्यक्ष गोपाल पिल्लई यांनी केली. ​अ​मेझॉन इंडियाचं हे धोरण ऑफलाइन दुकानांसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. ग्राहकांना दुकानात न जाताच घरपो​च  किराणा मिळेल, असंही पिल्लई म्हणाले. अमेझॉनने आतापर्यंत ५ हजार किराणा दुकानांसोबत साइन-अप केलं आहे, ज्यात टाटाच्या क्रोमासह इतर महत्त्वाच्या प्लॅटफॉर्म्सचाही समावेश आहे.​​

अर्थ-उद्योग जगतातील ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here