अंकुर जैन ‘भारतपे’चे नवे सीएफओ 

मुंबई :
भारतातील सर्वात मोठी व्यापारी पेमेंट, आणि कर्ज देणारी नेटवर्क कंपनी ‘भारतपे’ने अंकुर जैन यांना मुख्य उत्पादन अधिकारी म्हणून नियुक्त करून आपली नेतृत्व टीम मजबूत केली आहे. अंकुर हे भारतपे मध्ये  उत्पादनाचे लाईफसायकल आणि इनोव्हेशन यांसाठी जबाबदार असतील. अंकुर हे भारतपेमधील पाचवे सीएक्सओ असून ते विजय अग्रवाल (सीटीओ), निशित शर्मा (मुख्य महसूल अधिकारी), पुनीत अग्रवाल (मुख्य जोखीम अधिकारी) आणि निशांत जैन (मुख्य व्यवसाय अधिकारी) यांच्यासोबत मुख्य संघात सामील झाले आहेत.

‘हा’ ठरला देशातील पहिला ‘सेफ्टी फर्स्ट’ मॉल
Ankur Jain, May 2020

सर्व कस्टमर टच पॉईंट्सचे उत्पादन प्रबंधन आणि ग्राहक अनुभव नेतृत्व करणारे अंकुर हे भारतपेच्या १० दशलक्ष व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचण्याच्या आक्रमक योजनेसाठी योगदान देतील. स्टॅनफोर्ड विद्यापिठाचे विद्यार्थी असलेल्या अंकुर यांच्याकडे कोसमिक्स आणि इन्स्टालोकेट या तंत्रज्ञान स्टार्टअप कंपन्यांमध्ये आणि वॉलमार्ट या जगातील सर्वात मोठ्या कंपनीमध्ये काम करण्याचा समृद्ध अनुभव आहे. त्यांनी लार्ज स्केल उत्पादने विकसित केले आहेत जे जगभरातील लाखो लोकांनी वापरले आहेत आणि संस्थांना मोठा महसूल मिळवून दिला आहे. भारतात वॉलमार्ट लॅब कार्यालय सुरू करण्यासाठी असलेल्या संस्थापक संघाचे सदस्य होते आणि त्यांच्याकडे जगभरातील व्यवसाय, तंत्रज्ञान आणि प्रोडक्ट व्हर्टीकल्समध्ये क्रॉस फंक्शनल टीम तयार करण्याचा पर्याप्त अनुभव आहे.
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here