मुंबई :
ट्रक मालकांसोबत एकजुटीने उभ्या राहणा-या व्हील्सआयने ‘अपना पंप’ (apana pump) नावाचा इंधन केंद्रीत उपक्रम सुरू केला आहे. देशभरातील ट्रक मालकांना उत्कृष्ट गुणवत्ता, कमी किंमत आणि वास्तविक प्रमाणात डिझेलचे आश्वासन या उपक्रमाद्वारे मिळेल. इंधनाच्या वाढत्या दरांनी ट्रकचालकांचे कंबरडे मोडलेल्या तसेच कोव्हिड-१९मुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून मार्ग काढणा-या ट्रक मालकांना याद्वारे दिलासा मिळेल.
आपली पोहोच वाढवण्याच्या दृष्टीने व्हील्सआयने देशभरात ७५० रिफ्युइलिंग पंप ऑनबोर्ड केले आहेत. येथे ट्रक मालकांना १ टक्के कॅशबॅक ऑफर दिली जाईल. याद्वारे १० ट्रकचे मालक असलेल्यांना वर्षभरात व्हील्स आय (apana pump) अपना पंपद्वारे १ लाख रुपयांची बचत करता येऊ शकेल. कमी किंमतीत दर्जेदार इंधन पुरवण्यातून व्हील्सआय ट्रक मालक आणि ट्रक चालकांवरील अतिरिक्त आर्थिक ओझे काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न करते.
५० टक्के ईएमआयमध्ये घेऊन ‘जावा’
व्हील्सआयचे प्रवक्ते विपुल खन्ना म्हणाले, ‘अपना पंप’ हा सध्याच्या संकटात ट्रक चालकांना आधार देण्यासाठीचा एक प्रयत्न आहे. त्यांना हव्या तेवढ्या प्रमाणात कमी किंमतीत उत्तम प्रतीचे इंधन याद्वारे मिळू शकते. यामुळे संकटकाळात त्यांच्या एकूण पैशांची बचत होऊ शकते. त्यामुळे त्यांच्यावरील आर्थिक बोजाही कमी होईल. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठठी ट्रक मालक आणि ट्रक चालक त्यांचा मोबाइल आणि वाहन नोंदणी क्रमांक आमच्याकडे नोंदवू शकतात. ते 9354-933-692 या नंबरवर कॉल करून उपक्रमाविषयी अधिक माहिती घेऊ शकतात.’
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक करा…