मुंबई :
दक्षिण आशिया व मध्य पूर्व आशिया या भागांतील पहिले ‘प्रोटॉन थेरेपी सेंटर’ असलेल्या ‘अपोलो प्रोटॉन कॅन्सर सेंटर’ ला (एपीसीसी) ‘जॉइंट कमिशन इंटरनॅशनल’ (जेसीआय) या संस्थेकडून अधिस्वीकृती मिळाली आहे. ‘जेसीआय’ ही आरोग्यसेवांमधील दर्जानिश्चिती करणारी जागतिक स्तरावरील आघाडीची संस्था आहे. यामुळे ‘एपीसीसी’ हे आंतरराष्ट्रीय मान्यता असणारे कर्करोगासाठीचे भारतातील पहिले समर्पित व प्रगत कर्करोग उपचारकेंद्र ठरले आहे. तसेच हे अपोलो हॉस्पिटल समुहामधील ‘जेसीआय अधिस्वीकृतीप्राप्त’ असे आठवे रुग्णालय आहे. जून २०१९ मध्ये ‘एपीसीसी’ ची सुरुवात झाली. ‘प्रोटॉन थेरपी’ आणि ‘कॅन्सर केअर मॅनेजमेन्ट’ साठी जगभरातील एकमेव कर्करोग उपचार केंद्र आहे. सर्वोत्तम जागतिक पद्धतींचा अवलंब आणि अतिशय काळजीपूर्वक रूग्णांची निगा व सुरक्षितता, यासाठी आरोग्यसेवा उद्योगात ‘जेसीआय’ ची अधिस्वीकृती मिळत असते. हा एक प्रतिष्ठित मापदंड आहे.
अपोलो हॉस्पिटल्स समुहाचे अध्यक्ष डॉ. प्रताप सी. रेड्डी म्हणाले, “भारतात कर्करोगाचे वाढते प्रमाण व त्या तुलनेत ‘ऑन्कोलॉजी सेंटर्स’ची कमतरता या बाबी आम्ही सुमारे २५ वर्षांपूर्वी लक्षात घेतल्या. त्यानुसार कर्करोगावरील उपचारांसाठी प्रगत केंद्र ‘अपोलो’ मध्ये उभारले. अगदी सुरुवातीपासूनच, आम्ही कर्करोगाच्या उपचारांमध्ये सर्वात प्रगत तंत्रज्ञान आणले. अगदी आतासुद्धा दक्षिण आशिया व मध्य पूर्व आशियातील पहिले ‘प्रोटॉन थेरपी केंद्र’ आम्ही ‘अपोलो प्रोटॉन कॅन्सर सेंटर’मध्ये सुरू केले आहे. यातून आमच्या रूग्णांसाठी सर्वोत्तम उपचार देण्यामध्ये असलेली आमची बांधिलकी स्पष्ट होते. कर्करोग उपचार या विषयातील सर्वोत्कृष्ट असे पहिले १० विशेषज्ञ आपल्याबरोबर कार्य करीत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. या तज्ज्ञांनी आपल्या रुग्णांची यथोचित काळजी घ्यावी, यासाठी आम्ही त्यांना प्रगत, अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे. आमचे रुग्णालय हे जगातील सर्वोत्कृष्ट स्वरुपाचे ‘प्रोटॉन केअर सेंटर’ बनावे, ही आमची तळमळ आहे,’’ असेही डॉ. रेड्डी म्हणाले.
‘उपकर्मा’ने आणली आयुर्वेदिक सौंदर्यप्रसाधने
‘जेसीआय’च्या अध्यक्षा व मुख्य कार्यकारी अधिकारी पॉला विल्सन म्हणाल्या, “जागतिक महामारीच्या काळातही ‘जेसीआय’ ची मान्यता मिळवून आंतरराष्ट्रीय दर्जाची आणि रुग्णांच्या सुरक्षाविषयक मानकांची पूर्तता करण्याच्या वचनबद्धतेबद्दल ‘अपोलो प्रोटॉन कॅन्सर सेंटर’ चे आम्ही कौतुक करतो. ‘जेसीआय’ च्या व्हर्च्युअल सर्वेक्षण प्रक्रियेचा उपयोग करून ‘एपीसीसी’ ने ही कामगिरी बजावली. या सर्वेक्षणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जाते. ‘जेसीआय’ तर्फे ऑन-साइट सर्वेक्षण ज्या निकषांवर व काटेकोरपणे केले जाते, त्याप्रमाणेच आमची ‘व्हर्च्युअल’ सर्वेक्षण प्रक्रियाही कार्यक्षम आहे हे यातून सिद्ध झाले आहे. शारीरिक अंतर राखणे आणि इतर सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करून आम्ही हे साध्य केले आहे.”
‘जॉइंट कमिशन इंटरनॅशनल’ची अधिस्वीकृती हे रुग्णांची काळजी व सुरक्षा यासाठी सर्वोच्च आंतरराष्ट्रीय मापदंडांचा अवलंब करणार्या संस्थांना दिले जाणारे जागतिक स्तरावरील सुवर्ण-मानक आहे. ‘जेसीआय’चे तज्ज्ञ चिकीत्सक, परिचारिका आणि आरोग्यसेवा प्रशासक यांच्या पथकाने ‘एपीसीसी’मधील एक हजाराहून अधिक घटकांचे मूल्यांकन केले, तसेच प्रस्थापित मानके आणि सतत सुधारणांसाठीचे प्रयत्न यांच्याशी ‘एपीसीसी’मधील कामगिरीची तुलना केली. त्यानंतर या संस्थेने ‘एपीसीसी’ला मान्यता दिली. ही अधिस्वीकृती म्हणजे रूग्णांना सुधारित व प्रगत उपचार देणाऱ्या आमच्या रुग्णालय व्यवस्थापनाचे आणि कर्करोगावरील उपचारांच्या जटिल निकषांचे प्रमाण आहे.
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक करा…