फळं-भाज्या धुण्याचा ‘साफू’ मार्ग

मुंबई :
केविनकेअरच्यावतीने वापरण्‍यास सुलभ अशा सॅशे फॉर्मेटमध्‍ये भाज्‍या व फळांसाठी ब्रॅण्‍ड ‘साफू’ वॉशेसची घोषणा केली. भारतातील अनेक कुटुंबे ताजे उत्‍पादन स्‍वच्‍छ करण्‍यासाठी शुद्ध पाण्‍याचा वापर करण्‍यावर अधिक भर देतात. असे असताना देखील साफू उत्‍पादनांचे सॅशे फॉर्मेट ग्राहकांना फूड प्रभावीपणे स्‍वच्‍छ करण्‍यामध्‍ये साह्य करण्‍यासाठी बाजारपेठेमध्‍ये सादर करण्‍यात आले आहे. जागतिक अन्‍न सुरक्षा दिनानिमित्त सादर करण्‍यात आलेले सॅशे ताजे उत्‍पादन स्‍वच्‍छ करण्‍यासाठी सोल्‍यूशन्‍सच्‍या गरजेवर भर देत असल्याचे कम्पनीच्यावतीने सांगण्यात आले.
साफू वेजीज अॅण्‍ड फ्रूट्स वॉश आणि साफू मीट वॉश अशा दोन प्रकारात हे  वॉशेस उपलब्ध आहेत. ग्राहकांच्‍या अन्‍न सुरक्षितता संदर्भातील गरजा लक्षात घेत आणि संशोधनाच्‍या पाठबळासह केविनकेअर हा मांस व सीफूडसाठी खासरित्‍या बवनण्‍यात आलेले क्‍लीन्सिंग लिक्विड सादर करणारा भारतातील पहिला ग्राहक ब्रॅण्‍ड आहे. साफू वॉशेस् आपण सेवन करणा-या अन्‍नामध्‍ये नकळतपणे राहू शकणारे जिवाणू, रसायने व कीटकनाशके काळजीपूर्वक काढून टाकण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. ही उत्‍पादने १०० टक्‍के फूड ग्रेड इन्‍ग्रेडिएण्‍ट्सपासून बनवण्‍यात आली आहेत आणि स्‍वच्‍छ केल्‍यानंतर पदार्थांची मूळ चव निघून जात नाही. 

लोणचं, तुम्हांला जसं हवं तसं…

केविनकेअरच्‍या पर्सनल केअर अॅण्‍ड अलायन्‍सचे संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी वेंकटेश विजयराघवन म्‍हणाले, ”सद्यस्थितीमध्‍ये आपल्‍या जीवनाच्‍या प्रत्‍येक पैलूमध्‍ये सुरक्षित आरोग्‍य व स्‍वच्‍छताविषयक सवयी असण्‍याची अत्‍यंत गरज असताना फूड स्‍वच्‍छ करण्‍यासोबत सेवन करण्‍याच्‍या पद्धतीकडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही. ज्‍यामुळे अन्‍न विभागात सुरक्षित आरोग्‍यदायी व स्‍वच्‍छ उत्‍पादनांची उपलब्‍धता वाढवणे ही आपली जबाबदारी आहे. ही बाब लक्षात घेत आम्‍ही आमच्‍या ग्राहकांना पाठिंबा देण्‍यासाठी आणि पदार्थ स्‍वच्‍छ करण्‍याच्‍या पद्धतीमध्‍ये बदल घडवून आणण्‍यासाठी सॅशे फॉर्मेटमध्‍ये ब्रॅण्‍ड साफू वेजीटेबल्‍स अॅण्‍ड फ्रूट्स वॉश सादर केला आहे. मांस व सीफूड अधिक प्रमाणात स्‍वच्‍छ करावे लागत असल्‍यामुळे त्‍यांच्‍यासाठी खास वॉश सादर करण्‍याची गरज आम्हाला दिसून आली. या सादरीकरणामुळे ग्राहक सध्‍याच्‍या काळादरम्‍यान अधिक विश्‍वासाने अशा पदार्थांचा आस्‍वाद घेऊ शकतात.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here