असे रोखा डिजिटल हल्ले… 

cyber security

सध्याच्या “न्यू नॉर्मल” परिस्थितीमुळे यापूर्वी कधीही नव्हता इतका आपला इंटरनेट आधारित उपकरणांचा वापर दूरस्थ कामकाज (रिमोट वर्किंग), आर्थिक व्यवहार, ऑनलाइन शॉपिंग, अभ्यास आणि मनोरंजन अशा विविध बाबींसाठी वाढला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ऑनलाइन गेमिंग आणि मोबाइल गेमिंगची लोकप्रियता वाढत असतानाच कोव्हिड-१९ मुळे देशबरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या कालावधीत तर वेळ घालवण्याचे ते एक लोकप्रिय साधन बनले. मात्र, इंटरनेटच्या या वाढत्या वापरामुळे आपल्याला विविध प्रकारच्या ऑनलाइन धोक्यांना सामोरे जावे लागू शकते, हे आपण विसरता कामा नये. त्यामुळेच  या धोक्यांची व्याप्ती नेमकी किती असेल, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यानंतरच आपल्याला आपले आणि आपल्या उपकरणांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलता येतील.
नॉर्टनलाइफलॉक डिजिटल वेलनेसच्या ताज्या अहवालानुसार* ऑनलाइन गेमिंगचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो आणि ऑनलाइन गेमिंगमुळे मुलांना ऑनलाइन धोक्यांना सामोरे जावे लागू शकते, असे सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ८७ टक्के प्रतिसादकर्त्यांना वाटते. बहुसंख्य ऑनलाइन गेम्स चॅट सेवेचा वापर करतात, ज्याचा गैरफायदा हॅकर्स आणि सायबर गुन्हेगार सहज घेऊ शकतात. ८१ टक्के प्रतिसादकर्ते त्यांच्या उपकरणांवर पॅरेंटल कंट्रोल सुविधेचा वापर करतात, तर ऑनलाइन गेम्स खेळताना अपरिचित व्यक्तीच्या संपर्कात येण्याने सायबर दमबाजीसारख्या संकटांना सामोरे जावे लागू शकते, याची ७० टक्के प्रतिसादकर्त्यांना जाणीव आहे, असेही या सर्वेक्षणात आढळून आले आहे.
मात्र, सायबर धोके किंवा छळवणुकीचा धोका केवळ मुलांनाच नसल्याचेही या अहवालातून दिसून आले आहे. प्रौढ व्यक्ती देखील काही बाबतीत, विशेषतः ऑनलाइन डेटिंगसारख्या बाबतीत धोकादायक ऑनलाइन वर्तणूक करत असल्याचे दिसून येते. यामुळे खासगीपणा आणि डाटा सुरक्षेच्या बाबतीत खरोखर काळजी करण्यासाठी परिस्थिती निर्माण होऊ शकते. तब्बल ४० टक्के प्रतिसादकर्त्यांना डेटिंग अॅपच्या माध्यमातून नुकत्याच संपर्कात आलेल्या व्यक्तीला प्रत्यक्षात कधी न भेटता देखील आपली व्यक्तिगत माहिती पुरवण्यात काहीही वावगे वाटत नाही. नेमक्या अशाच प्रकारच्या वर्तणुकीबाबत आपण सावध असले पाहिजे. डेटिंग अॅप असो वा ईमेल, अपरिचित व्यक्तीला आपली व्यक्तिगत माहिती पुरवताना आपण नेहमीच खबरदारी घेतली पाहिजे.  
पुरुष प्रतिसादकर्त्यांपेक्षा (७४ टक्के) महिला प्रतिसादकर्त्या (८४ टक्के) सायबर धोक्यांविषयी अधिक जागरुक असून त्यांनी आपल्या स्मार्टफोनमध्ये सिक्युरिटी सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले असल्याचेही अहवालातून आढळून आले आहे. याखेरीज, ७१ टक्के महिला प्रतिसादकर्त्या (६३ टक्के पुरुष प्रतिसादकर्त्यांच्या तुलनेत) अॅप प्रायव्हसी आणि फोनमधील परमिशन्सच्या संदर्भात अधिक काळजी घेत असल्याचे दिसते. आपल्या फोनमधील प्रायव्हसी परमिशन्समध्ये ताळमेळ साधण्याच्या संदर्भात मिलेनिअल्स (९४ टक्के) आणि जेन एक्सपेक्षा (९० टक्के) जेन झेड (९५ टक्के) वापरकर्ते अधिक सजग असल्याचे दिसते.
आपले विश्व डिजिटली अधिकाधिक जोडले जात असताना घर आणि कामाच्या ठिकाणचे वातावरणही सातत्याने बदलत असून या पार्श्वभूमीवर ऑनलाइन धोक्यांपासून स्वतःचा आणि आपल्या प्रियजनांचा बचाव करण्यासाठी आपण अधिक काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी काही सोप्या उपाययोजना आपण करू शकतो.

‘लेग्रँड’च्यावतीने डेटासेंटर इन्फ्रास्ट्रक्चर सोल्यूशन
cyber security
आपली ऑनलाइन ओळख सुरक्षित ठेवण्यासाठी नॉर्टनलाइफलॉक खालीलप्रमाणे काही सर्वोत्तम उपाय सुचवते :
• बळकट पासवर्डचा वापर :
विविध वेबसाइट्स आणि अॅप्ससाठी एकाच पासवर्डचा वापर करू नका. पासवर्ड हा गुंतागुंतीचा, किमान १० अक्षरे, आकडे आणि चिन्हांचे मिश्रण असलेला सहज अंदाज न लावता येणारा कुठलाही शब्द असावा. गुंतागुंतीचा, ओळखता न येणारा पासवर्ड बनवण्यासाठी पासवर्ड मॅनेजरची मदत देखील उपयुक्त ठरू शकते.
• तुमचे सॉफ्टवेअर अद्ययावत ठेवा :
सायबर गुन्हेगार नेहमी तुमच्या सॉफ्टवेअरमधील परिचित त्रुटींचा फायदा घेऊन तुमच्या यंत्रणेत शिरकाव करण्याचा प्रयत्न करतात. या त्रुटी दूर केल्यास तुम्ही सायबरगुन्ह्यांचे लक्ष्य बनण्याची शक्यता बरीचशी कमी होते.
• विचारपूर्वक क्लिक करा :
फिशिंगचे प्रयत्न आणि शंकास्पद ऑफर्सबाबत सावधगिरी बाळगा. अपरिचित स्त्रोताकडून आलेले संशयास्पद ईमेल अथवा टेक्स्ट संदेशांतील लिंकवर क्लिक करू नका अथवा अटॅचमेंट्स उघडू नका. अशा लिंक्स कदाचित तुम्हाला अशा वेबसाइट्सवर घेऊन जाऊ शकतात, जिथे तुम्हाला तुमची व्यक्तिगत माहिती उघड करावी लागू शकते किंवा त्या वेबसाइट्सच्या माध्यमातून तुमच्या उपकरणांत मालवेअर शिरकाव करू शकतात. एखाद्या वस्तूवर तुम्हाला आकर्षक ऑफर दिसली तर ती योग्य व विश्वासार्ह विक्रेत्याकडून आहे, याची खातरजमा करा.
• फुल-सर्विस इंटरनेट सिक्युरिटी सूटचा वापर करा :
अँटी-मालवेअर, स्पॅम आणि फिशिंग यांसारख्या अस्तित्वातील तसेच संभाव्य धोक्यांपासून रिअल टाइम संरक्षण देणाऱ्या सर्वसमावेशक ऑल-इन-वन प्रोटेक्टिव्ह सोल्युशनमध्ये, तसेच बँकिंग, खरेदी अथवा ऑनलाइन प्रेम व्यवहारात, सार्वजनिक वायफायचा वापर केला तरी ग्राहकांची उपकरणे आणि माहिती सुरक्षित ठेवणाऱ्या क्लाउड तंत्रज्ञानात गुंतवणूक करा.
• ओळख चोरीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आवश्यक पावले उचला :
तुम्ही ऑनलाइन काय टाकता याबाबत काळजी घ्या. तुमच्या प्रोफाइलवर तुमचा पत्ता अथवा व्यक्तिगत माहिती कधीही टाकू नका. असे केल्याने ओळखचोरीबरोबरच पाठलाग आणि छळवणुकीसारख्या त्रासांनाही सामोरे जावे लागू शकते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here