औरंगाबाद : १६ मजूरांचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू

औरंगाबाद :
जालन्यातील एका कंपनीत काम करणाऱ्या १६ मजूरांचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना करमाड-औरंगाबादमध्ये घडली आहे. बदनापूर ते करमाडदरम्यान मालगाडीखाली चिरडून १४ जणांचा जागीच मृत्यू झाला.
जालन्यातील एका स्टील कंपनीत काम करणारे हे १९ मजूर गावी जाण्यासाठी पायी औरंगाबादकडे निघाले होते. औरंगाबाद येथून गावी जाण्यासाठी रेल्वे पकडणार होते. जालना ते औरंगाबाद रेल्वे रूळाहून पायी जाताना रात्री ते सर्वजण रुळावर झोपले होते. सर्वजण झोपेत असतानाच मालगाडी वरून गेल्यामुळे १४ जणांचा चिरडून मृत्यू झाला. तर पाच मजूर गंभीर जखमी झाले होते. जखमीपैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जखमींवर रेल्वे रूग्णालयात जखमींवर उपाचार सुरू आहेत.
यामध्ये मृत्युमुखी धर्मेंद्र सिंह(२०), ब्रिजेंद्र सिंह(२०), निर्बेश सिंह (२०), धन सिंह (२५), प्रदीप सिंह, राज भवन, शिव दयाल, नेमसहाय सिंह, मुनिम सिंह, बुधराज सिंह, अचेलाल, रविंद्र सिंह या मजुरांचा मृत्यू झाला. 

‘एलजी पॉलिमर्स’मधून गॅसगळती; ८ जणांचा मृत्यू

काय झाले नेमके? :
जालना येथील स्टील कंपनीचे १९ कामगार भुसावळला जाण्यासाठी रेल्वेरुळावरून पायी निघाले होते. सटाना परिसरात ते रुळावर झोपले असताना मालगाडीने त्यांना चिरडले. यात १६ जण ठार  तर २ कामगार जखमी झाले. सर्वांचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज नेहुल यांनी सांगितले.

uddhav-thackeray
मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत :
मजुरांच्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींवर सरकारी खर्चाने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देशही दिले आहेत. परराज्यातील मजूर आणि कामगारांसाठी जास्तीत जास्त रेल्वे सोडाव्यात यासाठी केंद्राशी सातत्याने बोलत असून लवकरच सर्वांची परतण्याची व्यवस्था होईल. या कामगारांनी धीर सोडू नये असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

रेल्वेचे म्हणणे काय?
लोको पायलटने ट्रॅकवर कामगारांना पाहिल्यानंतर मालगाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने दुर्घटना घडली अशी माहिती रेल्वेने दिली आहे. “कामगारांना ट्रॅकवर पाहिल्यानंतर लोको पायलटने मालगाडी थांबवण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने बदनापूर आणि करमाड स्थानकांदरम्यान दुर्घटना घडली. जखमींना औरंगाबाद सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत,” अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

​पंतप्रधानांनी घेतली दखल :
​या प्रकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दखल घेतली असून, रेल्वे मंत्र्यांशी चर्चा केली आहे. तसेच या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असल्याचंही मोदी म्हणाले आहेत. आवश्यक मदत केली जाईल, असंही आश्वासन मोदींनी दिलं आहे.
त्यानंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीसुद्धा ट्विट केलं आहे. आज पहाटे ५.२२ वाजता नांदेड डिव्हिजनच्या बदनापूर व करमाड स्टेशनजवळ काही कामगारांचा मालगाडीच्या खाली येऊन अपघात झाल्याची दुःखद बातमी समजली आहे. बचावकार्य सुरू असून, रेल्वे अधिकाऱ्यांना तपासाचे आदेश दिले आहेत. मृतांच्या आत्म्यांना ईश्वर शांती देवो, यासाठी प्रार्थना करतो, असंही पीयूष गोयल म्हणाले आहेत.  
 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here