भाज्यांना आता मिळणार ‘हिलिंग टच’

मुंबई :
एन रंगा राव अॅण्‍ड सन्‍स या सायकल प्‍युअर अगरबत्तीजच्‍या निर्माता कंपनीने आयुष मंत्रालय प्रमाणित ”हिलिंग टच वेजीटेबल अॅण्‍ड फ्रूट वॉश” सादर केले. या हिलिंग टच वेजीटेबल अॅण्‍ड फ्रूट वॉशमध्‍ये प्रोप्रायटरी आयु‍र्वेदिक सुत्रीकरण, १०० टक्‍के फूड-ग्रेड साहित्‍य असण्‍यासोबत कोणत्‍याही प्रकारचे कृत्रिम पदार्थ नाहीत.
हिलिंग टच वेजीटेबल अॅण्‍ड फ्रूट वॉश ५०० मिली लिक्विड कॉन्‍सेन्‍ट्रेट बॉटलमधून विक्री करण्‍यात येईल. लिक्विड कॉन्‍सेन्‍ट्रेट १०० टक्‍के शाकाहारी आहे आणि यामध्‍ये अल्‍कोहोल, सल्‍फेट्स, पॅराबेन्‍स, फ्थॅलेट्स व इतर रसायने नाहीत. उत्‍पादनातील सक्रिय घटकांमध्‍ये आयुर्वेदिक फार्माकोपियात सूचीबद्ध असलेले कडुलिंब, हळद, निंबूकम्लाम, मीठ आणि नारळ अर्क यांचा समावेश आहे. हे घटक एकत्र काम करत शक्तिशाली प्रतिजैविक व क्लीन्झिंग सोल्‍यूशन देतात. हिलिंग टच ब्रॅण्‍ड आधुनिक काळातील समस्‍यांसाठी सोल्‍यूशन्‍स विकसित करण्‍याकरिता प्राचीन आयुर्वेदिक पद्धती आणि आधुनिक माहिती तंत्रांच्‍या शास्‍त्राचा उपयोग करते. वेजीटेबल अॅण्‍ड फ्रूट वॉश जीवाणू व विषाणू सारखे सूक्ष्‍मजीव, किटकनाशक व धूळीसह प्रदूषकांमुळे फळे व पालेभाज्‍यांच्या होणा-या सदूषणाला प्रतिबंध करते. धुतल्‍यानंतर पालेभाज्‍या व फळांची मूळ चव निघून जाणार नाही या खात्रीसाठी उत्‍पादनामधील साहित्‍य काळजीपूर्वक निवडण्‍यात आले आहे.

पीएनबीने केली ‘इतक्या’ कोटींची कर्ज मंजुरी 

या सादरीकरणाबाबत बोलताना एन. रंगा राव अॅण्‍ड सन्‍सचे संचालक किरण रंगा म्‍हणाले, ”हिलिंग टच वेजीटेबल्‍स अॅण्‍ड फ्रूट वॉश कुटुंबांना पालेभाज्‍या व फळे स्‍वच्‍छ करण्‍यासाठी आणि त्‍यामधील धूळ व प्रदूषके दूर करत किचनमध्‍ये जीवाणू व सूक्ष्‍मजीवांना प्रवेश करण्‍यास प्रतिबंध करण्‍यासाठी सोईस्‍कर सोल्‍यूशन देते. आम्‍ही ”उपचारापेक्षा प्रतिबंध उत्तम” या प्राचीन म्‍हणीचा अवलंब केला आहे, जो आयुर्वेदाचे आयुर्वेदिकवर आधारित प्रोप्रायटरी सुत्रीकरण व फूड ग्रेड साहित्‍य तयार करण्‍याचा प्रमुख विश्‍वास आहे. यामधून आपण दैनंदिन जीवनामध्‍ये आरोग्‍य व स्‍वच्‍छताविषयक सवयी अवलंबण्‍याची खात्री आपल्याला मिळू शकते.” हिलिंग टच वेजीटेबल अॅण्‍ड फ्रूट वॉश रेंज ५०० मिली स्‍क्रू नेक बॉटलमध्‍ये उपलब्‍ध आहे. झाकणाचे आकारमान १० मिली आहे आणि पाण्‍याने भरलेल्‍या बादलीमध्‍ये योग्‍य प्रमाणात सोल्‍यूशन घेण्‍यासाठी हे झाकण वापरता येऊ शकते. ज्‍यामुळे ग्राहकांना अधिक सोईस्‍करता मिळते. हे उत्‍पादन भारतामध्‍ये निर्माण करण्‍यात आले आहे आणि यामध्‍ये १०० टक्‍के स्‍थानिक पातळीवरून घेण्‍यात आलेल्‍या कच्च्या साहित्‍याचा वापर करण्‍यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here