बाबा रामदेवची आता स्वदेशी इ-कॉमर्स साईट 

नवी दिल्ली:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा आग्रह सुरु केल्यानंतर आता अवघ्या २४ तासांत बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखाली पतंजलि आयुर्वेदने भारतात निर्मिती झालेल्या उत्पादनांचा पुरवठा करण्यासाठी एक विशेष ई प्लॅटफॉर्म सुरू करत असल्याचे घोषित केले. ऑर्डरमी डॉट ​इन​ असे नाव असलेल्या या प्लॅटफॉर्मवर केवळ स्वदेशी उत्पादनांचा पुरवठा केला जाणार आहे.
ऑर्डरमी वर पतंजलि स्वत:ची उत्पादने विकण्यासोबतच इतर भारतीय उत्पादने विकणाऱ्या अन्य स्टोर्सनाही या प्लॅटफॉर्मशी जोडणार. या साईटवरून लोक आपल्या गरजेचे सामान ऑर्डर करू शकतात. यासोबतच वेबसाईटवर ऑर्डर केल्यानंतर अवघ्या काही तासातच डिलीव्हरी मिळू शकणार आहे.
याशिवाय पतंजलिचे तब्बल १५०० डॉक्टर आणि योग प्रशिक्षक लोकांना २४x७ मोफत मार्गदर्शन करतील. पुढील १५ दिवसांत हा ई कॉमर्स प्लॅटफॉर्म लाँच होण्याची शक्यता आहे.
‘गोव्याला पाहिजे १०० कोटीचे पॅकेज’

पतंजलि आयुर्वेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बालकृष्ण यांनी याला दुजोरा देत म्हटले, हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वोकल फॉर लोकल कॉलला दिलेला प्रतिसाद आहे.बालकृष्ण पुढे म्हणाले, orderme केवळ स्वदेशी उत्पादनांचा पुरवठा करणार तसेच स्थानिक विक्रेते आणि छोट्या दुकानदारांना जोडत स्वदेशी आंदोलन पुढे नेण्याचा पतंजलिचा प्रयत्न असेल. बालकृष्ण म्हणाले, घरगुती उत्पादनांचे वितरण करणारे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना ई कॉमर्स साईटशी जोडण्यासाठी तसेच त्यांना याचा लाभ मिळावा यासाठी प्रोत्साहन दिले जाईल.
ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here