‘त्या’ कंपन्यांना राज्यांकडे वळवा :पंतप्रधान मोदी

china, modi

नवी दिल्ली :
करोना व्हायरसच्या संकटामुळे अनेक कंपन्या चीनमधून बाहेर प़डू शकतात. ही आपल्यासाठी संधी आहे. राज्यांनी ही गुंतवणूक आपल्याक़डे आकर्षित करण्याचा प्रयत्न करावा” असे मत पंतप्रधान मोदी (Narendra modi) यांनी व्यक्त केले. पंतप्रधान मोदी यांनी काल व्हिडीओ कॉन्फरन्सवरुन विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर संवाद साधला. करोना व्हायरसची सध्याची स्थिती, लॉकडाउन या मुद्दांबरोबरच चिनी गुंतवणूकीसंदर्भातही या बैठकीत चर्चा झाली.
“चीनमधून बाहेर पडणाऱ्या कंपन्यांची गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्यांनी सज्ज रहावे. पुरेसे कुशल मनुष्यबळ आणि पायाभूत सोयी-सुविधामुळे भारतामध्ये चीनला पर्याय ठरण्याची क्षमता आहे” असे मोदी म्हणाले. “करोना व्हायरसमुळे अनेक कंपन्या चीनच्या पलीकडे पर्याय शोधत आहेत. ही गुंतवणूक राज्यांमध्ये आणण्यासाठी आपण सर्वांनी मिळून व्यापक रणनितीवर एकत्र काम केले पाहिजे” असे मोदी (modi) मुख्यमंत्र्यांना म्हणाले.
china
‘…तर लाखो भारतीय गरिबीच्या फेऱ्यात’

मागच्या आठवडयात पंतप्रधान मोदी यांनी करोना व्हायरस सारख्या संकटाचा सामना करण्यासाठी देशाने स्वावलंबी असले पाहिजे असे मत व्यक्त केले होते. सध्याच्या परिस्थितीत अर्थव्यवस्था नाजूक स्थितीमध्ये आहे. त्यामुळे चीनकडून एफडीआयच्या माध्यमातून भारतीय कंपन्यांवर नियंत्रण मिळवले जाऊ शकते. हेच रोखण्यासाठी मोदी सरकारने शेजारी देशांमधून भारतात होणाऱ्या गुंतवणूकीसंदर्भात एफडीआयचे नियम बदलले आहेत. एफडीआय नियमांमध्ये बदल होताच चीनने लगेच आपला आक्षेपही नोंदवला.

अर्थ-उद्योग जगतातील ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here