‘बायोसप’ने आणली किफायतशीर कोरोना सुरक्षा उत्पादने

मुंबई :
बायोसप (Biosup) हेल्थकेअरने फेस मास्क, हँड सॅनिटायझर आणि हँड रब्स ही तीन नवी उत्पादने बाजारात आणली आहेत. यातील बायोहँड सॅनिटायझर्स हे १०० टक्के अँटीसेप्टिक असून पाण्याविना ९९.९९% जंतू नष्ट करण्याची क्षमता त्यात आहे. हे ५० मिली, १०० मिली, ५०० मिली आणि ५ लिटर या प्रमाणात अनुक्रमे २५ रु, ५० रु., १०० रु,, २५० रु., २५०० रुपयांना उपलब्ध आहे. फेसमास्कमध्ये थ्री प्लाय डिस्पोजेबल फेस मास्क, मेल्ट ब्लोन फेस मास्क, कॉटन वॉशेबल फेसमास्क असे पर्याय उपलब्ध आहेत. ही उत्पादने नोजपिनसह किंवा त्याविना मिळतात. तसेच ५,१० आणि ५० च्या समुहासह स्वच्छ अनुकुल पॅकेजिंगमध्ये ६ रुपयांपासून सुरू होणाऱ्या विविध किंमतीत मिळतात.
बायोहँड्स रब इन हँड हे जंतुनाशक एक ब्रॉड स्पेक्ट्रम अँटी मायक्रोबियल उत्पादन आहे. अँटीसेप्टीक हँडरबमध्ये अँटीमायक्रोबियल एजंट असून ते लावल्यास हातावरील बॅक्टेरिया नष्ट होतात. हे उत्पादन मुलांसाठी योग्य असून ते हाताना मुलायम आणि स्वच्छ ठेवते. कार्यालय किंवा घरात दीर्घकालीन वापरासाठीही हे सर्वात चांगले आहे. हे दोन आकारात उपलबद्ध आहे. ५०० मिलि आणि ५ लिटरचे उत्पादन अनुक्रमे २५० रुपये आणि २५०० रुपयांना उपलब्ध आहे.

‘हार्टफुलनेस’चा करुणामय योगा 

बायोसप हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक हिंमांशू बिंदल म्हणाले, “कोव्हिड-१९ विरुद्धची ही आपली लढाई दीर्घकाळ सुरू राहणार असून आपल्या लोकांचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बायोसपमध्ये व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय तसेच इतरांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याकरिता प्रत्येक प्रतिबंधात्मक उपाययोजना आखून त्यांची काळजी घेणे हे आमचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. सध्याच्या समस्येवर सर्वोत्कृष्ट उपाय देण्याचा तसेच आमच्या ग्राहकांचे आरोग्य लक्षात घेऊन सर्व उत्पादने निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here