‘लॉरेट मेडल’ पुरस्काराने ‘ब्लू डार्ट’ सन्मानित

मुंबई :
ब्लू डार्ट या देशातील आघाडीच्या लॉजिस्टिक सेवा पुरवठादार कंपनीने ग्रेट प्लेस टू वर्क® (जीपीटीडब्लू) आणि द इकॉनॉमिक्स टाईम्सच्या टॉप 50 ऑफ इंडियाज बेस्ट कंपनीज टू वर्क फॉर २०२०(काम करण्यासाठी भारतातील सर्वोत्कृष्ट कंपन्या) यादीत स्थान मिळवले आहे. त्याचप्रमाणे 10 वर्ष ‘इंडियाज बेस्ट कंपनीज टू वर्क फॉर’ (काम करण्यासाठी भारतातील सर्वोत्कृष्ट कंपन्या) या यादीत स्थान मिळवल्याबद्दल मानाचा ‘लॉरेट मेडल’ या पुरस्कारानेही ब्लू डार्टला सन्मानित करण्यात आले आहे.
या यशाबद्दल ब्लू डार्ट एक्स्प्रेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बलफर मॅन्युअल म्हणाले, ‘आपल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देणारी कंपनी अशी ब्लू डार्टची ओळख कायमच आहे. आमच्या व्यवसायाचे केंद्रस्थान असलेले आमचे ब्लू डार्टर्समुळेच आम्ही दणकट ब्रँड विश्वासाहर्ता आणि बाजारपेठेतील नेतृत्वासह आघाडीवर आहोत. त्यांच्या कौशल्य आणि मेहनतीमुळेच आम्ही आमच्या ग्राहकांसाठी निवडीचे पर्याय देणारे आणि गुंतवणुकीचा निवडक पर्याय असल्याचे म्हणू शकतो. यातूनच आम्ही त्यांच्यासाठी एम्प्लॉयर ऑफ चॉईस असल्याची खातरजमा होते. आमच्या ‘व्यक्ती प्रथम’ तत्वामुळे’  आम्ही माणसांमध्ये गुंतवणूक करणे कायम ठेवले आहे आणि त्यातून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम असे वातावरण निर्माण करू शकलो. यामुळे, आमच्या ग्राहक आणि भागधारकांच्या अपेक्षेपलिकडे हे कर्मचारी सातत्याने कामगिरी करतात. अशा टीमचा भाग असणं ही माझ्यासाठी फार मोलाची बाब आहे.’

शेतीमाल सेवेसाठी ‘समारू’चा पुढाकार

ब्लू डार्ट एक्स्प्रेस लिमिटेडचे सीएचआरओ राजेंद्र घग म्हणाले, “आमच्या व्यवसायाचा पाया आमचे ब्लू डार्टर्स आहेत, याची आम्हाला जाणीव आहे. ‘उच्च बांधिलकी जपणारे ब्लू डार्टर्स ग्राहकांना आनंदी ठेवतात’ हे सुरुवातीपासूनच आमचे तत्व राहिले आहे. ब्लू डार्टमध्ये आम्ही हे जाणतो की संस्थेचा पाया उत्तम असेल तर त्यातून बळकट ब्रँड मूल्य निर्माण होते. त्यामुळेच आम्ही आमच्या टीममध्ये निष्ठा, आपण करू शकतो, पहिल्या वेळी योग्य आणि एकी ही आमची चार तत्वे बाणवतो. आमच्या टीमवर विविध एचआर उपक्रमांतून लक्ष दिले जाईल, याचीही आम्ही खातरजमा करतो.
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here