वैद्यकीय किट पोहोचवण्यासाठी ‘ब्लू डार्ट’चा पुढाकार

​​मुंबई :
कोरोनामुळेच्या लॉकडाउनच्या अत्यंत महत्वाच्या काळात देशभरात वैद्यकीय उपकरणे आणि फार्मास्युटिकल उत्पादने हॉस्पिटल्स आणि वैद्यकीय संस्थांपर्यंत पोहोचवण्यासाठी ब्लू डार्ट एक्सप्रेसने आपल्या रिटेल शुल्कात २५ टक्के कपात केली आहे. या कठीण काळात ग्राहकांना त्यांच्या मालवाहतुकीच्या गरजांवर उपाययोजना पुरवण्यासाठी आणि अत्यावश्यक मालाच्या पुरवठ्यात सातत्य राहावे म्हणून कंपनीने हा निर्णय घेतल्याचे कंपनीचे सीएमओ आणि हेड बिझनेस डेव्हलपमेंट  केतन कुलकर्णी यांनी सांगितले. या सुविधेचा लाभ स्थानिक रिटेल ग्राहकांबरोबरच सर्व एमएसएमईंनाही दिला जाणार आहे.कंपनीकडे प्रत्येकी 34 टनांची क्षमता असलेली सहा बोईंग 757 मालवाहू विमाने असून, लॉकडाऊनच्या काळात भारतभरातील शहरांमध्ये ही विमाने अत्यावश्यक सामुग्री घेऊन उड्डाणे करीत आहेत.
यासंदर्भात बोलताना केतन कुलकर्णी यांनी सांगितले कि, “ब्लू डार्टचा ‘फाइट कोविड 19 – प्राइस (एफसी19-पी)’  हा एक अनोखा उपक्रम आहे आणि या आणीबाणीच्या वेळी देशाप्रति ते आमचे कर्तव्यही आहे. देशावर जेव्हा जेव्हा आपत्ती कोसळली तेव्हा तेव्हा आम्ही नेहमीच “फर्स्ट इन लास्ट आउट” अशी भूमिका घेऊन त्यात उतरलो आहोत. आमचा देश अभूतपूर्व परिस्थितीशी झगडतो आहे, याचा अर्थव्यवस्थेवर व्यापक परिणाम होणार आहे. वाहतूकव्यवस्थाच स्थगित झाल्याने अनेक क्षेत्रांतील आणि प्रांतांतील व्यवसायांमध्ये व्यत्यय आला आहे. त्यामुळे आम्ही हे पाऊल उचलले आहे. पीपीई टेस्टिंग किट्स, रिएजंट्स, एन्झाइम्स, वैद्यकीय उपकरणे (व्हेंटिलेटर्स), मास्क्स, रेस्पिरेटर्स, सर्जिकल मास्क्स, ग्लव्ह्ज आणि इतर वस्तूंच्या वेगवान आणि विनाअडथळा डिलिव्हरीसाठी एक प्रभावी मार्ग आहे. यातील काहींचे उत्पादन एमएसएमई क्षेत्र करीत असून त्यांची वापराच्या ठिकाणी डिलिव्हरी करणे हे त्यांच्यासाठी एक आव्हान होते. ब्लू डार्टने स्वत:ची www.civilaviation.gov.in या डेडिकेटेड मेडिकल एअर कार्गो वेबसाइटवर नोंदणी केल्याचेही त्यांनी नमूद केले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here