मुंबई :
‘ब्ल्यू डार्ट’ कुरिअर सेवेने आपल्या सेवेला सुरुवात केली असून, कंपनीने नुकत्याच त्यांच्या महत्त्वपूर्ण डोअर-टू-डोअर एक्सप्रेस पिकअप आणि डिलिव्हरी सेवेसाठी कॉण्टॅक्टलेस डिलिव्हरी सुरू केली आहे. शिपमेंटच्या डिलिव्हरीदरम्यान संपर्क कमीतकमी असावा किेंवा अजिबातच नसावा यासाठी आरोग्य आणि सुरक्षेच्या अत्यंत कडक नियमांअंतर्गत ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
ब्ल्यू डार्टतर्फे आपल्या बळकट हवाई आणि रस्ते मार्गांवरील एक्स्प्रेस नेटवर्कच्या माध्यमातून भारतातील 35000 हून अधिक ठिकाणी सामानाची सुरक्षित आणि विश्वासार्ह डिलिव्हरी दिली जाते. गृह मंत्रालयाने आखून दिलेल्या नियमांनुसार ग्राहकांना डोअर-टू-डोअर पिक-अप आणि डिलिव्हरी सेवांचा लाभ घेता येईल.
जागतिक बँकेकडून भारताला १ अब्ज डॉलरचे पॅकेज
ब्ल्यू डार्ट एक्सप्रेस लि.च्या बिझनेस डेव्हलपमेंटचे प्रमुख आणि चीफ मार्केटिंग ऑफिसर केतन कुलकर्णी म्हणाले, सुरुवातीच्या राष्ट्रीय लॉकडाऊनच्या काळात आम्ही देशातील वैद्यकीय सुविधांना बळकटी दिली, तर सध्याच्या लॉकडाऊनमध्ये देशातील उद्योगाला चालना देणारा एक घटक म्हणून आम्ही बँकिंग, इन्शुरन्स, वित्त सेवा, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, एफएमसीजी, ईकॉमर्स अशा विविध क्षेत्र आणि उद्योगांसोबत काम करून व्यवसाय आणि वैयक्तिक शिपमेंटची दळणवळण शक्य करत आहोत आणि आमच्या कॉण्टॅक्टलेस डिलिव्हरी सेवेमध्ये आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात आहे.शिपमेंटच्या डिलिव्हरीदरम्यान कमीतकमी वा शून्य संपर्क यावा या पद्धतीने ब्ल्यू डार्टच्या नव्या कॉण्टॅक्टलेस डिलिव्हरी सेवेची रचना करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांनी कंपनीने देऊ केलेल्या डिजिटल पेमेंट पद्धतींमधील पर्याय निवडायचा आहे. जसे की – 14 डिजिटल वॉलेट्स, नेट बँकिंग, क्रेडिट आणि डेबिट कार्ड्स आणि यूपीआय (भीम). इतकेच नाही, सहजसोप्या आणि सुरक्षित डिलिव्हरी प्रक्रियेसाठी ब्ल्यू डार्टने ओटीपीवर आधारित डिलिव्हरीचाही पर्याय दिला आहे.
ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज