लॉकडाऊनबाधितांना ‘बिएनआय’चा मदतीचा हात 

पणजी :
कोविड १९ च्या प्रसारामुळे संपूर्ण जग ठप्प झाले आहे. आणि या साथीच्या रोगाविरुद्धच्या लढाईत भारत सक्रीयतेने कार्यरत असून गोव्यासारखे राज्यही अतिशय चांगले काम करून लक्ष वेधत आहे. या कठीण परिस्थितीत लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने बीएनआय गोवाकडून व्यवसाय क्षेत्राची सामान्यपणे पुनर्रचना करण्यासाठी हातभार लावला जात आहे. १३ विभागातून आणि ५५० पेक्षा अधिक सदस्यांच्या मदतीने लोकांना विविध पातळीवर मदत पोहचविण्याचे कार्य बीएनआयने केले आहे.
बीएनआयने प्रवासी, कामगार आणि गरजू तसेच भटक्या प्राण्यांना दररोज शिजवलेले जेवण देण्यात आले. या उपक्रमासाठी त्यांना प्लॅनेट हॉलीवूड, ह्यूमन वेलफेयर ट्रस्ट, लंगर फॉर हंगर आणि शीख यूथ पर्वरी यांनी सढळ मदत केली. या टाळेबंदीच्या पहिल्या ३० दिवसांच्या कलावधील त्यांच्याकडून सुमारे अडीच लाख लोकांना शिजवलेले अन्न देण्यात आले. गरजूंना अन्नधान्याच्या पिशव्याही पुरविण्यात आल्या. यासाठी त्यांना ह्युमॅनीटेरिअन रिलिफ संस्थनेही मदत केली. यावेळी दहा हजारपेक्षा अधिक घरांमध्ये अन्नधान्याच्या पिशव्या पोहच करण्यात आल्या. बीएनआय गोवाच्या सदस्यांनी टी.बी. इस्पितळ आणि मडगाव येथील इएसआय इस्पितळात कित्येक लिटर हँड वॉश आणि फ्लोर क्लीनर, हजारो पेपर प्लेट्स, टिशू पेपर आणि पेपर कपसुद्धा पुरवले. सरकारी यंत्रणा आणि इतर रुग्णालये आणि संस्था यांनी त्यांनी केलेल्या कार्यासाठी त्यांचे कौतुक केले आहे. बीएनआय गोवा आणि व्हायब्रंट गोवा फाउंडेशनने आपले सदस्य आणि हितचिंतकांच्या माध्यमातून डॉक्टरांच्या आणि हॉस्पिटलच्या कर्मचार्‍यांचा समावेश असलेल्या फ्रंटलाइन वॉरियर्ससाठी 1025 पीपीई किट गोव्याच्या आरोग्य विभागाला दिल्या आहेत. हि मदत त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यामार्फत पोहचवली.

‘महिंद्रा’ देतेय दिव्यांग आणि माजी सैनिकांना रोजगार

बीएनआय- गोवा यांनी नुकताच दहावा वर्धापन दिन साजरा केला आणि या खास प्रसंगी बीएनआय गोवाचे कार्यकारी संचालक राजकुमार कामत यांनी घेतलेल्या ऑनलाईन उपक्रमासाठी सुमारे ४५० पेक्षा अधिक लोकांनी त्यांच्या घरातून उपस्थिती दर्शविली. जागतिक दर्जा असणाऱ्या या उपक्रमामध्ये मॅक श्रीनिवासन, मुरली श्रीनिवासन, डॉ. जगत शहा आणि नितीन कुंकळयेकर असे चार वक्ते होते. या कार्यक्रमात गोवा बीएनआयच्या सर्व 13 विभागातील मागील सहा महिन्यांच्या कामगिरीसाठी वैयक्तिक तसेच विभागीय पुरस्कारही देण्यात आले. यावेळी गिव्हर्स ऑफ द डिकेड हा पुरस्कार होता जो वैयक्तिक तसेच विभागांना देण्यात येतो. मनोज पाटील आणि आर्किटेक्ट अविनाश बोरकर यांना अनुक्रमे उत्तर गोवा आणि दक्षिण’ गोवासाठी हा पुरस्कार देण्यात आला. 
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here