बीएनआय-गोवाची आंतर-प्रदेश व्यावसायिक परिषद

पणजी :
बीएनआय-गोवा यांनी उद्योजकांच्या व्यवसाय वृध्दीसाठी गोवा आणि हुबळी-धारवाड येथील उद्योजकांच्यात सहयोगी व्यवसाय संभाव्यतेसाठी पहिल्या ऑनलाईन आंतर-प्रदेश परिषदेचा प्रारंभ केला. बीएनआय गोवाचे सदस्य आणि हुबळी विभागातील सदस्यांच्यात संवाद साधण्यासाठी आणि व्यवसायिक संबंध स्थापित करण्यासाठी ही संकल्पना तयार केली गेली. राज्याबाहेरील लोकांपर्यंत पोहचण्यासाठी असोसिएशनतर्फे व्यावसायिक वृध्दीसाठी आणि व्यावसायिक संधी निर्माण करण्यासाठी व्यासपीठ निर्माण केले आहे.
प्रत्येक प्रदेशातील सुमारे पन्नास सदस्यांना स्वत: चा परिचय करून देण्याची आणि ग्राहक तसेच चॅनेल पार्टनर इत्यादींशी संबंध जोडण्याची संधी मिळविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. बांधकाम, फायनान्स, इंटेरिअर्स, गुड्स अँड सर्व्हिसेस, माहिती तंत्रज्ञान यासारख्या विविध क्षेत्रातील सदस्यांनी या परिषदेत भाग घेतला. ज्यामुळे त्यांची उत्पादने आणि सेवा लोकांसमोर आणण्यास मदत झाली.यापूर्वी देखील अशा परिषदा आणि उपक्रम आयोजित करण्यात आले होते ज्यामुळे सदस्यांना डीलरशिप संधी उपलब्ध होण्यासाठी मदत झाली आहे आणि जगभरातील पार्टनरसोबत संपर्क साधण्याचे नवीन मार्ग देखील तयार केले आहेत.

प्रियंका पाठक ठरली ‘ग्रिड’ची विजेती
BNI
बीएनआय गोवाचे कार्यकारी संचालक राजकुमार कामत म्हणाले, “या परिषदेचे आयोजन करण्यासाठीचा उद्देश राज्याबाहेरील लोकांशी सुदृढ नातेसंबंध निर्माण करणे हा आहे. आम्ही आमच्या सदस्यांना इतर क्षेत्रातील सदस्यांसोबत कनेक्ट(व्यावसायिक संबंध प्रस्थापन) आणि नेटवर्क निर्माण करणयासाठी मदत करण्यासाठीचे उद्दीष्ट साध्य करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. व्यवसायिक वृद्धी आणि संकल्पना देवाणघेवाण करण्यासाठी योग्य माध्यम म्हणून आम्ही अशी व्यासपीठे तयार करणार आहेत.
बीएनआय हुबळी – धारवाडचे कार्यकारी संचालक श्रेयस नाडकर्णी, बीएनआय. हुबळी-धारवाडचे वरिष्ठ संचालक सल्लागार अरमान बंकले यांनी एकत्रितपणे व्यवसाय वृद्धीसाठी या परिषदेच्या माध्यमातून समर्थन दिले. या संमेलनाचे यश पाहता, ७ ऑगस्ट रोजी गोवा, हुबळी आणि कोल्हापूर येथील सदस्यांसाठी तीन स्थळातील आंतर-प्रदेश संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here